कूरघाेड्यांना वैतागले राष्ट्रवादीचे आमदार; पदाचा राजीनामा देणार

पक्ष त्यांची समजूत काढणार की नवीन जिल्हाध्यक्ष नियुक्त करणार याची चर्चा हाेऊ लागली आहे.
कूरघाेड्यांना वैतागले राष्ट्रवादीचे आमदार; पदाचा राजीनामा देणार
Babajani Durrani

परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp) आमदार बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा पवित्रा घेतला आहे. त्याबाबत त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांच्याशी संवाद साधला आहे. babajani durani resigns ncp president parbhani jayant patil

Babajani Durrani
NCP आमदार शशिकांत शिंदे उद्या राजकीय वाटचाल स्पष्ट करणार

गेल्या काही दिवसांपासून येथील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडद्याआड अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे आमदार बाबाजानी दुर्रानी राजीनामा देण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यांनी राजीनामा दिल्यास नवा जिल्हाध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुरु झाली आहे.

राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीमुळे आमदार बाबाजानी दुर्रानी अस्वस्थ होते. त्यांना काही दिवसांपुर्वी मारहाण झाली होती. त्यात पक्षाने बाबाजानी यांच्याकडून कोणतीही पाऊले उचलली गेली नाहीत. परभणी जिल्हात बाबाजानी हे राष्ट्रवादीच्या वाढीसाठी मोठे योगदान असून बाबाजानी यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीला पुढील काळात मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. पक्ष त्यांची समजूत काढणार की नवीन जिल्हाध्यक्ष नियुक्त करणार याची चर्चा हाेऊ लागली आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com