Bacchu Kadu
Bacchu KaduSaam TV

Bachchu Kadu News: मोबाईलचं रिचार्ज करून देण्यासाठी दिव्यांग बांधवाचा थेट बच्चू कडूंना कॉल, व्हिडिओ व्हायरल

Nanded News: बच्चू कडू हे प्रवासात असताना त्यांना नांदेड जिल्ह्यातील मोसखेळ गावातील एका दिव्यांग बांधवाने फोन केला.

>>अमर घटारे, साम टीव्ही

Prahar News: दिव्यांग बांधवांसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलेल काम सर्वश्रुत आहे. राज्यभरातील दिव्यांग बांधवांना बच्चू कडू यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतात. नुकतेच शिंदे सरकारने दिव्यांग मंत्रालयाची स्थापना करून दिव्यांग बांधवांना मोठा दिलासा दिला आहे. या कार्यकर्त्यांचा बच्चू कडूंवर किती हक्क आहे हे सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत तुम्ही पाहू शकता.

बच्चू कडू हे प्रवासात असताना त्यांना नांदेड जिल्ह्यातील मोसखेळ गावातील एका दिव्यांग बांधवाने फोन केला. बच्चू कडू यांनी हा फोन घेतला आणि त्याची विचारपूस केली. यानतंर त्या बांधवाने मोबाईलमधील रिचार्ज संपले असून रिचार्च करून देण्याची विनंती केली.

Bacchu Kadu
Shiv Sena Symbol Row : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; आता संसदेतील शिवसेनेचं कार्यालयही शिंदे गटाला दिलं

बच्चू कडूंनी देखील त्याच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिला. बच्चू कडू यांनी त्याला त्याचे नाव गाव आणि इतर माहिती विचारली आणि त्याच्या फोनचे रिचार्ज करून दिले. बच्चू कडू यांच्या दिलदारपणाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. (Latest Marathi News)

Bacchu Kadu
Sena Bhavan : एखाद्या ट्रस्टची जागा सेना भवनाला कशी दिली? तक्रार करणारे योगेश देशपांडे आहे तरी कोण?

एखाद्या कार्यकर्त्यांचं रिचार्ज संपलं आणि ते नेत्याने करून दिलं असं कदाचित तुम्ही ऐकलं असेल. प्रत्येक नेता कार्यकर्त्यासाठी नेहमी उपलब्ध असतो असे नाही. परंतु माजी राज्यमंत्री बच्चू कडू याला अपवाद ठरले आहेत. बच्चू कडू यांच्या याच्यावर कार्यकर्त्यांचा किती हक्क आहे, याचं उदाहरण तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता. (Latest Political News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com