Bacchu Kadu: भाजप-शिवसेनेते जागावाटपावरुन शीतयुद्ध; बच्चू कडूंच्या वक्तव्याने युतीतलं टेन्शन आणखी वाढलं

प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी पुढे काय होईल हे कसं सांगता येईल म्हणत सस्पेन्स आणखी वाढवला आहे.
Mla Bacchu Kadu
Mla Bacchu Kadu Saam Tv

Political news: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेनेचे (शिंदे गट) टेन्शन वाढलं आहे. त्यातच आता बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यानमुळे भाजप-शिवसेना युतीत नेमकं काय सुरुये असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या शिंदे सरकारला पाठिंबा दिलेल्या बच्चू कडू यांनी युतीबाबत अद्याप निर्णय नाही असं सांगत आगामी काळात पेच निर्माण होईल, असं सूचित केलं आहे.

शिंदे-फडणवीस सरकारमधल्या भाजप-शिवसेनेसह बत असलेल्या पक्षांचं नेमकं काय सुरू आहे, हे सध्यातरी महाराष्ट्राला कळायला मार्ग नाही. कारण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 288 पैकी 240 जागा भाजप लढवणार असल्याचं सांगितल्यानंतर शिंदे गटातील आमदार अस्वस्थ झाले आहे. आता त्यात प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी पुढे काय होईल हे कसं सांगता येईल म्हणत सस्पेन्स आणखी वाढवला आहे. (Political News)

Mla Bacchu Kadu
Mohammad Kaif : हवेत उडत कैफचा जबरदस्त कॅच; प्रत्येकाने परत परत बघावी अशी फिल्डिंग, पाहा VIDEO

राज्यात पुढच्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. त्या अगोदर महानगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमध्ये निवडणूक लढवण्यासाठीचा भाजप आणि शिवसेना मित्र पक्षातील फार्मूला काय असेल यावर चर्चा सुरू आहेत. मात्र मित्र पक्षांचे काय हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. आता त्या अगोदरच भाजप आणि शिवसेनेतील आमदारांमध्ये तू-तू, मै मै होईल असं दिसतं.

Mla Bacchu Kadu
Bangladesh Accident : बांगलादेशमध्ये भीषण अपघात! भरधाव बस दरीत कोसळली; 17 प्रवाशांचा मृत्यू, 30 जण जखमी

प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी युतीबाबत अजून काही आमचं ठरलं नाही,येणारा काळ पाहून निर्णय घेऊ असे सुचक वक्तव्य केलं आहे. आता त्यापाठोपाठ राष्ट्रीय समाज पक्ष, आरपीआय याबाबत काय विचार करणार हे येणारा काळ ठरवेल. मात्र भाजपची रणनीती ही मित्र पक्षाला नेस्तनाबूत करणारी आहे. त्यामुळे बच्चू कडूंनाही नेमकं काय करायचं हे कळत नाही, असा चिमटा विरोधीपक्षाने काढला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com