हनुमान चालीसा सप्ताह ठेवा, आम्ही वर्गणी देऊ; बच्चू कडूंचा राणा दाम्पत्याला टोला

'मातोश्री हे शिवसेनेचे श्रद्धास्थान आहे प्रेरणा स्थान आहे. तिथे जाऊन तुम्ही अशा पद्धतीने वागता, ही दादागिरी नाही का?'
हनुमान चालीसा सप्ताह ठेवा, आम्ही वर्गणी देऊ; बच्चू कडूंचा राणा दाम्पत्याला टोला
Bachchu Kadu/ Rana CoupleSaam TV

अकोला : प्रामाणिक दादागिरीतूनच शिवसेनेची (Shivsena) निर्मिती झाली आहे. शिवसेनेची वाहाय्यात दादागिरी नाही. मातोश्री हे शिवसेनेचे श्रद्धास्थान स्थान, प्रेरणा स्थान आहे. तिथे जाऊन तुम्ही अशा पद्धतीने वागता, ही दादागिरी नाही का? असा प्रश्न राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी राणा दाम्पत्याला विचारला आहे. ते जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलत होते.

यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले, हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) देशाचा मुद्दा आहे का? आपापल्या धर्मातील लोकांनी घरात, मंदीर, मस्जिदमध्ये दहा वेळा त्यांनी म्हणावे. रस्त्यावर येण्याचा हा विषय नाही. रस्त्यावर फडकाविण्याचा विषय असेल तर तिरंगा फडकावा. गरीबांची सेवा करा, रुग्णालयात जा, हनुमान चालीसाचा सात दिवसांचा सप्ताह ठेवा, आम्ही वर्गणी देऊ, असा टोलाही पालकमंत्री बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्याला लगावला आहे.

Bachchu Kadu/ Rana Couple
राष्ट्रवादीने आमच्या पाठीत सुरा खुपसला; नाना पटोलेंचा गंभीर आरोप

दरम्यान, तुम्हाला लाज नाही वाटत, अशा पद्धतीने वागता. तुमच्या घरासमोर एखादा कार्यक्रम ठेवला तर चालेल का तुम्हाला? असा सवाल करत ते पुढे म्हणाले, मला वाटतं अशी दादागिरी आपण करायची, कोणी केली तर तुम्ही दादागिरी करता, असे आपण म्हणायचं. आम्ही एक थाप्पड मारतो, तुम्ही उभे रहा, असाच त्याचा अर्थ झाला. शिवसेना या मुठीतील नाही आहे. तुमचं सुदैव आहे तुम्हाला दणके बसले नाही, तुम्ही त्यातच खुशी माना, असा इशारा त्यांनी राणा दाम्पत्याला दिला.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.