तुमच्या मंत्रालयामुळे भाजप मजबूत झालीय; बच्चू कडू यांची नितीन गडकरी यांच्यावर स्तुतीसुमने

अकोल्यात उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले.
Bacchu Kadu
Bacchu Kadu Saam Tv

अकोला - महाविकास आघाडीमध्ये मंत्री असलेले बच्चू कडू (Bachuchu Kadu) यांनी आज नितीन गडकरी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. तुमच्या मंत्रालयामुळे भाजप मोठी झाल्याचा दावा करत बच्चू कडू यांनी गडकरी यांच्या कामाची स्तुती केली. अकोल्यात उड्डाणपुलाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री आणि भाजप (BJP) नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते पार पडले.

हे देखील पाहा -

दरम्यान या कार्यक्रमाला अकोल्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री बच्चू कडू हे ही उपस्थित होते. यावेळी बच्चू कडू यांनी भर सभेत नितीन गडकरी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. बच्चू कडू म्हणाले, तुम्ही महामार्ग सम्राट आहात, एखादा मंत्री किती काम करू शकतो. तेही राजकारण सोडून, कारण पार्टी हा विषय मी गडकरी साहेबांबाबत कधीच पाहिला नाही.

Bacchu Kadu
दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यानं चाकूने भोसकलं; आरोपीला बेड्या

मी स्वतः एक दोन वेळा त्यांच्याकडे काम घेऊन गेलो तेव्हा मला त्यांनी असं विचारलं नाही की, भाजप मध्ये येतोस काय? अशी मिश्किल टिपणी बच्चू कडू यांनी गडकरी यांच्यावर केलीय. दरम्यान असे निस्वार्थ पणे काम करणारे मंत्री जर देशाला लाभले तर निश्चितच विकासाची दिशा भेटल्या शिवाय राहणार नाही. तुमच्या बद्दल बोलावे तेवढे कमीच आहे असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले.

Edited By- Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com