बच्चू कडूंचे भर उन्हात श्रमदान, भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने दु:खी

अकोल्यात वंचितचे उपाध्यक्ष पुंडकर यांनी बच्चू कडू यांच्या विरोधात न्यायालयात भ्रष्ट्राचाराची तक्रार दाखल केली होती.
Bachchu Kadu
Bachchu KaduSaam TV

अकोला: आंदोलनाच्या हटके स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेले राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी अकोल्यात (Akola) आपल्यावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाविरोधात अनोख्या पध्दतीने उत्तर दिलं आहे. बच्चू कडू यांनी आज अकोल्यात 45 डिग्री तापमानात श्रमदान करून विरोधकांना उत्तर दिलं आहे. अकोल्यात वंचितचे उपाध्यक्ष पुंडकर यांनी बच्चू कडू यांच्या विरोधात न्यायालयात भ्रष्ट्राचाराची तक्रार दाखल केली होती. दरम्यान ही तक्रार खोटी असल्याचा आरोप पालकमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. त्यामुळे मी या तक्रारीमुळे खुप दुःखी झालो असून दुःख व्यक्त करण्यासाठी भर उन्हात श्रमदान करत असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

Bachchu Kadu
Breaking: राणा दाम्पत्याला दिलासा नाहीच; पुढील सुनावणी बुधवारी

डीपीडीसीचे अध्यक्ष असलेले पालकमंत्री बच्चू कडू यांनी रस्त्यांच्या कामांमध्ये अपहार केला आहे. फसवणूक केली आहे. अस्तित्वात नसलेले रस्ते व ग्रामा नंबर नसलेले रस्ते बांधण्यात आले असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता. त्यानुसार पालकमंत्री बच्चू कडू यांच्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हाही दाखल झाला होता. या सर्व प्रकाराला उत्तर देण्यासाठी पालकमंत्री बच्चू कडू यांनी श्रमदान करून आपले दुःख निराकरण करण्याचा प्रयत्न केला आहे.

डाबकी रोड येथील कॅनाल रोडवर असलेल्या गोरोबा महाराजांच्या मंदिरात समोरील रस्त्यावर त्यांनी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये श्रमदान केले. यावेळी कार्यकर्त्यांनी या श्रमदानामध्ये सहभाग घेतला. संपूर्ण रस्त्यावर त्यांनी मुरूम टाकला. भर उन्हामध्ये त्यांनी हे श्रमदान केले. यावेळी शहर अध्यक्ष मनोज पाटील यांनी यासाठी परिश्रम घेतले. तसेच महिला पदाधिकारी ही यावेळी उपस्थित होत्या. येथे आलेल्या नागरीकांसोबत पालकमंत्री कडू यांनी संवाद साधत त्यांचे निराकरण केले. नागरिकांचे निवेदन ही स्वीकारले.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com