Badlapur: मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवले

चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित
Badlapur: मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवले
Badlapur: मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवलेअजय दुधाणे

बदलापुर - मॉर्निग वॉकसाठी निघालेल्या 54 वर्षीय  महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी खेचून नेल्याची घटना बदलापूर मध्ये घडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरा चित्रित झाली आहे.

हे देखील पहा -

सुषमा पाटील या सकाळी 7 वाजताच्या सुमारास त्यांच्या मैत्रिणीसोबत  हेंद्रपाडा  भागातील मोहन व्हॅली समोरील रस्त्याने मॉर्निंग वॉक साठी जात होत्या ,त्या वेळेस  दुचाकीवर असलेले दोन चोर त्यांच्या मागावर होते. या चोरट्यांनी पाटील यांच्या समोरून दुचाकी वळवून  त्यांच्या गळ्यातील एक तोळा वजनाचे सोन्याच मंगळसूत्र खेचून दुचाकीवरून धूम ठोकली.

Badlapur: मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र लांबवले
ओ सेठ...वीज पुरवठा दिलाय थेट! वीज बिल वसुलीसाठी महावितरणचा अनोखा फंडा

ही सारी घटना सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाली असून याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सध्या बदलापुरमध्ये मंगळसूत्र चोरीचे प्रकार वाढल्याने महिला वर्गांमध्ये भीतीचे वातावरण  निर्माण झाले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Related Stories

No stories found.