Breaking : घराची भिंत कोसळून एकाचा मृत्यू; बदलापुरातील दुर्दैवी घटना

बदलापुरातून मोठं वृत्त समोर आलं आहे. बदलापूरमध्ये घराची भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
badlapur news
badlapur news saam tv

Badlapur News : बदलापुरातून मोठं वृत्त समोर आलं आहे. बदलापूरमध्ये घराची भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. बदलापूर गाव तलाव परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

badlapur news
नवी मुंबईत विवाहितेने 5 वर्षीय मुलासह इमारतीवरुन मारली उडी, धक्कादायक कारण आलं समोर; पतीला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर (Badlapur) गाव तलावाशेजारी आदिवासी पाडा असून इथं अनेक वर्षांपासून आदिवासी बांधव राहतात. काही वर्षांपूर्वी आदिवासी पाड्यावरील या रहिवाशांना घरकुल योजनेतून पक्की घरं बांधून देण्यात आली होती. याच भागात वसंत खंडू जाधव हे राहत होते.

मात्र, आज, बुधवारी वसंत खंडू जाधव यांच्या घराची भिंत कोसळली. यात वसंत जाधव यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे. या घटनेत एक लहान मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वसंत जाधव यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आदिवासी बांधवांनी घरांच्या दुरवस्थेकडे पालिकेनं लक्ष देण्याची मागणी केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com