Swine Flu | बदलापुरात आढळला स्वाईन फ्लूचा पहिला रुग्ण; नागरिकांचं टेन्शन वाढलं

बदलापूर शहरात स्वाईन फ्लूचा पहिला रुग्ण आढळला आहे. एका वयोवृद्ध डॉक्टरला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे.
Swine flue news
Swine flue news saam tv

बदलापूर : बदलापूर (Badlapur) शहरात स्वाईन फ्लूचा पहिला रुग्ण आढळला आहे. एका वयोवृद्ध डॉक्टरला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. त्यानंतर बदलापूर पालिकेची आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. दरम्यान, डोंबिवलीसहित (Dombivli) मिरा-भाईंदरमध्ये देखील स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आले आहेत. (Swine Flue In Badlapur)

Swine flue news
Monkeypox Update : भारतातील पहिल्या मंकीपॉक्स रुग्णाबाबत आली मोठी अपडेट

कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आल्यानंतर आता जगभरात पुन्हा एकदा स्वाईन फ्लूचा प्रसार वाढू लागला आहे. त्यातच ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूर शहरात स्वाईन फ्लूचा पहिला रुग्ण आढळला आहे. बदलापुरातील एका वयोवृद्ध डॉक्टरला स्वाईन फ्लूची लागण झाली असून परदेशातून आलेल्या एका नातेवाईकमुळे ही लागण झाल्याचं बदलापूर पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. राजेश अंकुश यांनी सांगितल आहे.

Swine flue news
हृदयद्रावक! वीज कोसळून चार शेतकरी महिलांचा मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळल्यानंतर संबंधित रुग्णाच्या परिसरात आरोग्य विभागाने ट्रेसिंग सुरू केलं आहे. बदलापूर शहर हे मुंबईजवळील सॅटेलाईट शहारांपैकी एक समजलं जातं. कारण या शहरात मुंबई आणि नवी मुंबईत कामाला जाणारे चाकरमानी सर्वाधिक संख्येने वास्तव्याला आहेत. कोरोना काळात बदलापूर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळं स्वाईन फ्लूच्या पार्श्वभूमीवर बदलापूर पालिकेच्या आरोग्य यंत्रणेसह नागरिकांनी सतर्कता बाळगणं गरजेचं आहे.

मीरा भाईंदर मध्ये स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळले

मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा आलेख कमी झाल्याने पालिका प्रशासनाकडून दिलासा व्यक्त केला जात होता. मात्र, आता स्वाईन फ्लूने डोकं वर काढल्याने पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. मीरा भाईंदर परिसरातील विविध भागात स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळून आले असून या रुग्णांवर शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगामी काळात स्वाईन फ्लूच्या रुग्णामध्ये वाढ झाल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी प्रशासन सज्ज असून अशा रुग्णांसाठी मीरा भाईंदर महा पालिकेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात २० खाटांचे विलगिकरण कक्ष उभारण्यात आले आहे. या ठिकाणी संशयित रुग्णांची चाचणी करण्यासाठीची व्यवस्था देखील करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com