MLC ELECTION 2022 : 'निकालानंतर जो मला शिव्या देईल, मी त्याला मतदान केले आहे', हितेंद्र ठाकूरांचा टोला

बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाबाबत खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे.
MLC ELECTION 2022 : 'निकालानंतर जो मला शिव्या देईल, मी त्याला मतदान केले आहे', हितेंद्र ठाकूरांचा टोला
Hitendra Thakursaam TV

मुंबई : विधान परिषदेच्या (Vidhan Parishad Election) १० जागांसाठी आज निवडणूक होत असून सकाळपासून मुंबईच्या विधान भवनात मतदान सुरु होतं. दरम्यान, या निवडणुकीसाठी संपूर्ण मतदानाची प्रकिया पार पडली असून काँग्रेसने लक्ष्मण जगताप (Laxman jagtap) आणि मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या मतदानाला आक्षेप घेतला. परंतु, राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे आक्षेप फेटाळले आहेत. याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला लेखी कळवलं आहे.

Hitendra Thakur
रूपाली चाकणकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह कमेंट; बार्शीत २८ जणांविरोधात गुन्हा दाखल

कॉंग्रेसने भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेतला होता. मतदान करताना मतपत्रिकेवर सही केली पण पसंतीची मत देताना दुसऱ्याची मदत घेतली असा आरोप काँग्रेसने भाजपच्या या दोन मतांवर आक्षेप घेतला होता. एकीकडे हा गोंधळ सुरु असतानाच दुसरीकडे मात्र बहुचर्चीत असलेल्या बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे.

Hitendra Thakur
Ashadhi Wari 2022 : वारकऱ्यांना पुरेशा सुविधा द्या : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

आमदार हितेंद्र ठाकूर यांचे सर्वपक्षीय संबंध चांगले आहेत. यामुळे ते नेमकं कोणाला मतदान करतात, हा चर्चेचा विषय होता.महाविकास आघाडी असेल किंवा भाजप या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी बविआची मते मिळावी,यासाठी हितेंद्र ठाकूर यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर आज अखेर ठाकूर यांनी विधान परिषद निवडणुकीत (vidhan Parishad election) मतदान केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. निकालानंतर जो मला शिव्या देईल मी त्याला मतदान केले आहे, असा टोला ठाकूर यांनी नाव न घेता संजय राऊत यांना लगावला आहे.

राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे आक्षेप फेटाळले

राज्य निवडणूक अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे आक्षेप फेटाळले आहेत. याबाबत राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला लेखी कळवलं आहे. कॉंग्रेसने भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानाला आक्षेप घेतला होता. मतदान करताना मतपत्रिकेवर सही केली, पण पसंतीचं मत देताना दुसऱ्याची मदत घेतली, असा आरोप काँग्रेसने भाजपच्या या दोन मतांवर घेतला होता.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com