Chandrakant Patil
Chandrakant Patil Saam TV

Chandrakant Patil: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या तिघांना मोठा दिलासा; कोर्टाकडून जामीन मंजूर

विरोधक तसेच सत्ताधाऱ्यांनी सदर घटना योग्य नसल्याचे म्हटले.

Chandrakant Patil: मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्याने राज्याचं राजकारण चांगलच तापलं. विरोधक तसेच सत्ताधाऱ्यांनी सदर घटना योग्य नसल्याचे म्हटले. शाईफेक झाल्यानंतर या प्रकरणात मनोज घरबडेसह अन्य तीन व्यक्तींना अटक करण्यात आली होती. या तिघांना आता न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. (Latest Marathi News)

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी महापुरुषांवर केलेल्या वक्तव्याने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या. अशात पुण्यातच त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या शाईफेकीचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. यात स्पष्ट दिसत आहे की, त्यांच्या चेहऱ्यावर शाईफेक करण्यात आली आहे. मात्र तरी देखील दोषींवर ३०७ कलमासह अन्य मोठी कलमे लावण्यात आली आहेत.

शनिवारी शईफेकीची घटना घडली त्यानंतर लगेच आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तिघांविरोधात ३०७ कलम लावल्याने विरोधक चांगलेच संतापले होते. ३०७ कलम खुनाचा प्रयत्न केल्यास लावले जाते. मात्र प्रत्यक्ष घटना तशी नसून पाटलांवर फक्त शाईफेक करण्यात आली होती. त्यामुळे यात कुठेही खुनाचा प्रयत्न नसून लावण्यात आलेली कलमे चुकीची असल्याचे विरोधकांनी म्हटले. त्यानंतर मंगळवारी ३०७ कलम कमी करण्यात आले होते.

खुनाचे कलम लावण्याची मिळाली होती धमकी

वकील सचिन भोसले यांच्याकडे शाईफेकीचा गुन्हा दाखल असलेल्या तिघांची केस आहे. त्यांनी या विषयी सांगितले की, तिघांनीही फक्त शाईफेक केली होती. कुणाचाही जीव घेण्याचा त्यांचा प्रयत्न नव्हता. तसेच त्यांच्यावर लावण्यात आलेले ३०७ चे कलम पोलिसांवर दबाव असल्याने लावण्यात आले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com