बैलपोळा सण साहित्य विक्री थंडावली; शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद

नंदुरबार, कोवीडमुळे बैलपोळा सणाच्या पार्श्वभूमीवर बैलाला सजवण्यासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीत गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही शेतकऱ्यांचा कमी प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, विदर्भातील अनेक जिल्ह्यात बैलपोळ्यावर निर्बंध घालण्यात आल्याने मनसे आक्रमक झाली आहे.
बैलपोळा सण साहित्य विक्री थंडावली; शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद
बैलपोळा सण साहित्य विक्री थंडावली; शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसादSaamtv

नंदुरबार :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी संचारबंदी मुळे बाजारपेठा बंद असल्याने पोळा सणा निमित्त बैलांना सजवण्यासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदी-विक्रीत कमी प्रतिसाद होता. यंदा बाजारपेठा खुल्या असल्याने दरवर्षीप्रमाणे पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा होईल या उद्देशाने व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात साहित्य विक्रीसाठी ठेवले आहे. परंतु शेतकरी वर्गाकडून बैलांना सजवण्यासाठी लागणारे साहित्य खरेदीचे प्रमाण यंदा ही कमी असल्याने व्यापारी चिंतेत आहेत.

हे देखील पहा :

तसेच यंदा जिल्ह्यात कमी पर्जन्यामुळे शेती ही धोक्यात असल्याने बळीराजाच्या चिंतेत वाढ झाली असून याचा परिणाम बैल पोळा सणावर देखील होताना दिसून येत आहे. दिवसेंदिवस शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा वापर वाढल्याने बैल जोडी वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही घटल्याने बैलपोळा निमित्त बैलांना सजवण्यासाठी लागणारे साहित्याच्या खरेदी-विक्रीत मोठी घट झाल्याची प्रतिक्रिया व्यापारी वर्गाकडून व्यक्त होत आहे.

बैलपोळा सण साहित्य विक्री थंडावली; शेतकऱ्यांचा अल्प प्रतिसाद
Akola : बालिकेला रक्तातून HIV ची बाधा; ब्लड बँकेवर होणार कारवाई!

बैलपोळ्यावरून मनसे आक्रमक :

दरम्यान, नागपूर जिल्ह्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यात बैलपोळा सणावर बंदी घालण्यात आल्याने मनसे नेते आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. आधीच दहीहंडीवर राज्य सरकारकडून कोरोना संक्रमण स्थितीला सामोरे ठेवून गेल्यावर्षीप्रमाणे याहीवर्षी निर्बंध कायम ठेवण्यात आले होते. तेव्हाही केवळ हिंदू सणांवर राज्य सरकार निर्बंध घालत असल्याचा आरोप करून मनसेने राज्यभरात प्रतिदहीहंडी साजरी केली होती.

आता बैलपोळ्यानिमित्त मनसेने आक्रमक पावित्रा घेतला असून शेतकऱ्यांना विनाचिंता बैलपोळा साजरा करण्याचे आवाहन केले असून, मनसैनिक स्वतः प्रत्येक गावात जाऊन बैलपोळा साजरा करणार असल्याची माहिती मनसे नेते राजू उंबरकर यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com