श्रीगोंद्यातून बाळासाहेब नाहाटांनाही लढवायचीय आमदारकी!

श्रीगोंद्यातून बाळासाहेब नाहाटांनाही लढवायचीय आमदारकी!
बाळासाहेब नाहाटा, श्रीगोंद्यातील नेते.

अहमदनगर : श्रीगोंदा तालुक्याचे राजकारण कधी रंग बदलेल याची शाश्वती नाही. तेथे कोण कोणासोबत आहे आणि विरोधात आहे, हे कळायला मार्ग नाही. मध्यंतरी अण्णासाहेब शेलार यांनी उचल खाल्ली होती. त्यांनी श्रीगोंदा साखर कारखान्याच्या निवडणुकीवरून नागवडे कुटुंबावर टीकास्त्र सोडले होते. आता बाजार समिती महासंघाचे संचालक बाळासाहेब नाहाटा पुढे सरसावले आहेत.

श्रीगोंद्यात भाजपचे बबनराव पाचपुते हे भाजपचे आमदार आहेत. राष्ट्रवादी घनश्याम शेलार यांना त्यांच्याकडून निसटता पराभव स्वीकारावा लागला. तेथे तत्कालीन राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांनी माघार घेतल्याने तिकिट घनश्याम शेलार यांना मिळाले. त्यांनी अल्पावधीत पाचपुते यांना टक्कर दिली. आता राष्ट्रवादीकडून जगताप आणि शेलार इच्छुक आहेत. दुसरीकडे नागवडे कुटुंबातील अनुराधा नागवडे यांचीही आमदारकीची इच्छा आहे. त्यातच आता नाहाटांनी शड्डू ठोकल्याने श्रीगोंदा तालुक्याचे राजकारण बदलले आहे.Balasaheb Nahata will contest the Assembly elections

बाळासाहेब नाहाटा, श्रीगोंद्यातील नेते.
काँग्रेस नेता ः मी विनयभंग केलाय? थांबा, सीडी लावतो!

मी राजकारणापेक्षा समाजकारणाला कायम महत्त्व दिले. राजकीय पदापेक्षा समाजाच्या मनातील पद आपणाला सतत महत्त्वाचे वाटले. कुकडी व घोडच्या पाण्यासाठी सामान्यांना कायमच संघर्ष करावा लागला. शेतकऱ्याला हक्काचे पाणी मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला येतो, अशी खंत नाहाटा व्यक्त करतात.

तालुक्यात आमदारकी लढविण्याची घोषणा करताना त्यांनी सावध पवित्रा घेतला आहे. मध्यंतरी त्यांना एका आंदोलनात जेलची हवा खावी लागली होती. राजकीय द्वेषातून आपल्यावर गुन्हा दाखल झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. Balasaheb Nahata will contest the Assembly elections

झेडपीला नव्या पिढीला संधी

शिवाजीराव नागवडे, कुंडलिकराव जगताप, सदाशिव पाचपुते व प्रा. तुकाराम दरेकर यांची तालुक्याला नेहमीच कमतरता भासत आहे. वरील नेत्यांनी तालुक्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या राजकारणाचा कित्ता गिरवणार आहे. आता पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुका पुढच्या पिढीला संधी देऊ. संधी मिळाल्यास आमदारकी लढवू. कुणाला शह देण्यासाठी नाही, तर सामान्यांसह दिवंगत नेत्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ती निवडणूक लढेल. एकंदरीत त्यांनी आमदारकी लढविण्याची घोषणा करताना बेरजेच्या राजकाणाचा डाव टाकला आहे.

नाहाटा यांची दानशूर म्हणून प्रतिमा आहे.त्यांनी नेहमीच समाजकारणाऐवजी राजकारणाला महत्त्व दिले. कोरोना काळातही त्यांनी मोठी मदत केली. कोणी त्यांना म्हणतात, जाऊ द्या ना बाळासाहेब, ते म्हणतात लोकांसाठी मला आमदार व्हायचंच आहे.

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com