एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे, मुख्यमंत्र्यांचा फोटो नाही

एकनाथ शिंदे यांनी बंडाचे राजकारण केल्याने महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे, मुख्यमंत्र्यांचा फोटो नाही
Eknath Shinde Banner In Thanesaam tv

ठाणे : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचे राजकारण केल्याने महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे. जवळपास ४० आमदारांच्या पाठींबा घेवून शिंदे सूरतला गेले. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना समाजकारण आणि राजकारणाचे धडे देऊन ठाण्यात शिवसेनाचा बालेकील्ला उभा केला. त्यामुळे शिवसेनेच्या राजकारणात धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांचा सिंहाचा वाट असल्याचे बोलले जाते. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात एकनाथ शिंदे यांचे बॅनर झळकले आहेत. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोसोबत आनंद दिघे यांचा फोटो लावण्यात आला आहे. मात्र, (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ माजली आहे.

Eknath Shinde Banner In Thane
भाजप कॉंग्रेसचे आमदार फोडण्याच्या तयारीत ? बाळासाहेब थोरात म्हणाले...

मिळालेल्या माहितीनुसार, विधान परिषदेच्या निवडणुकीदरम्यान नगर विकास खात्याचे मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे नॉट रीचेबल झाले होते. त्यानंतर काल दिवसभर राजकीय गदारोळ सुरू होता. या घटनेनंतर मुंबईमध्ये शिवसेनेत गद्दारांना माफी नाही आणि शिवसैनिक त्यांना धडा शिकवतील. अशा प्रकारचा आंदोलन छेडण्यात आले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला.

एकनाथ शिंदे यांच्या घरावर किंवा यांच्या कार्यालयावर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, मात्र आज ठाण्यातील काही शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे यांना समर्थन असल्याचं दर्शवलेला आहे, अशा प्रकारचे बॅनर लावलेले आहेत. या परिसरातील काही समर्थकांनी कळवा नाका येथे एक बॅनर लावलेला आहे. आम्ही शिंदे साहेब समर्थक आहोत, असा मजकूर लिहून बॅनरवर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो लावण्यात आला असून उद्धव ठाकरे यांचा फोटो वगळला आहे. यावेळी आम्ही एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक असून शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर असणार आहोत, असे शिंदे समर्थक शिवसैनिकांनी म्हटलं आहे.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com