Devendra Fadanvis: बाळासाहेबांना अभिवादन करताना फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका, म्हणाले; 'बाळासाहेबांशी नातं..'

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे.
Devendra Fadanvis Udhav Thackeray
Devendra Fadanvis Udhav ThackeraySaamtv

Balasaheb Thackeray Birth Anniversary: हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती. तमाम शिवसैनिकांचे दैवत असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बाळासाहेब ठाकरे यांना सोशल मीडियावरुन देशभरातील अनेक नेत्यांनीही अभिवादन केले आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे. (Balasaheb Thackeray Birth Anniversary)

Devendra Fadanvis Udhav Thackeray
Shivsena: व्यंगचित्रकार ते 4 दशके मुंबईवर हुकूमत गाजवणारे हिंदुह्रदयसम्राट! बाळासाहेबांच्या 'या' ग्रेट गोष्टी माहित आहेत का?

याबाबत अधिक माहिती अशी की, बाळासाहेब ठाकरे यांची जयंती राज्यभरात आनंदात साजरी होत आहे. देशभरातील अनेक नेते त्यांना सोशल मीडियावरुन अभिवादन करताना दिसत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.

"बाळासाहेबांशी नाते हे रक्ताने होत नाही, ते विचारांनी करावं लागते. विचारांशी नाते हेच बाळासाहेबांशी खरे नाते आहे," असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. (Devendra Fadanvis)

Devendra Fadanvis Udhav Thackeray
MNS Video: 'बाळासाहेब म्हणाले आता जा..' शिवसेना सोडताना हिंदुह्रदयसम्राट अन् राज ठाकरेंचा 'तो' किस्सा; मनसेने शेअर केला खास Video

याबद्दल पुढे बोलताना, "जो जो विचारांशी नातं सांगेल, तोच खरा बाळासाहेबांचा अनुयायी असेल, ज्या विचारांनी बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली, तो विचार मोडू दिला जाणार नाही," असा निर्धारही देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त केला आहे.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन अभिवादन केले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com