Political News: श्रेयवादासाठी अनेकांचे प्रयत्न, कोणाच्या तोंडाला हात लावता येत नाही; थोरातांची विखे पाटलांवर अप्रत्यक्ष टीका

Balasaheb Thorat News: निळवंडे धरणातून कालव्यात सोडलेल्या पाण्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते जलपुजन
Political News
Political NewsSaam Tv

सचिन बनसोडे

Ahmednagar News Today: ३१ मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते अकोले तालुक्यातील निळवंडे धरणातून डावा कालव्यात पाणी सोडून चाचणी सुरू करण्यात आली. धरणापासून मजल दरमजल करत हे पाणी अकोले तालुक्यातून आता संगमनेर तालुक्यात पोहचल आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पिंपळगाव कोंझिरा येथे पाण्याचे जलपुजन केले. यावेळी ते म्हणाले की, आम्ही श्रेयवाद कधीही केला नाही. आम्ही कामासाठी सातत्याने प्रयत्न केले. हे नाकारता येणार नाही. श्रेय घेण्याचा अनेकजण प्रयत्न करत आहेत. कोणाच्या तोंडाला हात लावता येत नाही अशी सुद्धा काही माणसे आहेत अशी टीका थोरात यांनी विखे पाटलांचे नाव न घेता केली आहे. (Latest Marathi News)

Political News
Marriage Invitation Card: नादखूळा! अख्ख्या गावात डान्स करत हसमुख वाटताेय लग्न पत्रिका

दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करून पाण्याचे जलपुजन करण्यात आले. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. कार्यक्रमस्थळी आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली होती.

निळवंडे कालव्याचे पाणी संगमनेर तालुक्यात पोहचताच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पाण्याचे जलपुजन करण्यात आले. ५२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कॅनॉलमध्ये पाणी येत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी (farmer) आनंदोत्सव साजरा केला. निळवंडे धरणाच्या कामाचे श्रेय माझे एकट्याचे नसून अनेकांनी याबकामासाठी प्रयत्न केले आहेत. (Political News)

Political News
Jalgaon Accident News: लग्‍नाचे वऱ्हाड घेऊन जाणारी बस उलटली; ओव्‍हरटेक करताना सुटले नियंत्रण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचे सांगत सहा महिने वाया गेले. उन्हाळा संपला आता पावसाळा सुरू होईल त्यामुळे आम्ही पाणी सोडण्याचा आग्रह धरला. डावा कालवा सुरू झाला आता उजव्या कालव्याला पाणी सोडावे अशी मागणी यावेळी थोरात यांनी केलीये.

निळवंडेच्या कामात अनेकांचे योगदान आहे. पाणी मिळणार असल्याने दुष्काळी भागात मोठे परिवर्तन घडून अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. धरण आणि कालव्यांची कामे सुरू झाल्यानंतर अनेक अडचणी आल्या, आंदोलने झाली, मात्र आम्हाला पाणी मिळाले याचा आनंद आहे असे देखील बाळासाहेब थोरात म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com