Live : स्वातंत्र्यासाठी दुसरी लढाई जाेमाने लढू; बाळासाहेब थाेरात

balasaheb thorat
balasaheb thorat

सातारा : सध्या बाेलण्याच्या स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे. ईडी काेणाला माहिती नव्हती ती आता लहान पाेराला देखील माहिती झाली आहे. शेतक-यांवर हाेणारा अन्याय दूर व्हावा यासाठी लाखाे शेतकरी दिल्लीत धडकले पण काेणालाच त्याची फिकीर नाही. आता क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारखे प्रतिसरकार लढा उभारणे गरजेचे असल्याची भावना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थाेरात balasaheb thorat यांनी वडूज येथे व्यक्त केली. थाेरात यांनी केंद्र सरकाराच्या कारभारावर ताशेरे आेढले.

सातारा जिल्ह्यातील वडूज येथील तहसील कार्यालयावर ब्रिटिश सरकार विरोधात स्वातंत्र्य सैनिकांनी नऊ सप्टेंबर १९४२ मध्ये मोर्चा काढला होता. हा मोर्चा दडपवण्यासाठी ब्रिटिशांनी बेछूट गोळीबार केला होता. त्यात नऊ जणांना हौतात्म्य पत्करावे लागले. यामध्ये २४ जण गंभीर जखमी झाले होते. आज या घटनेला ७९ वर्षे पूर्ण झाली.

balasaheb thorat
साताऱ्यात राडा; नगरसेवकाच्या समर्थकांनी युवकास चाेपले, ६ गंभीर

या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील वडूज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आयोजित व्यर्थ न हो बलिदान , हुतात्मा अभिवादन आणि स्वातंत्र्य सैनिक सत्कार या कार्यक्रमास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण, मंत्री यशोमती ठाकूर, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मंत्री सतेज पाटील, मंत्री बाळासाहेब थोरात हे दिग्गज नेते उपस्थित आहेत. या कार्यक्रमात मंत्री थाेरात यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com