बाळासाहेब थोरातांनी सांगितले दिल्लीत जाण्याचे कारण

विधानसभा अध्यक्ष (Speaker of the Assembly) पदाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ४ दिवसांची गरज असते.
बाळासाहेब  थोरातांनी सांगितले दिल्लीत जाण्याचे कारण
बाळासाहेब थोरातांनी सांगितले दिल्लीत जाण्याचे कारणsaam tv

राज्यात अधिवेशन (session) झाल्यावर दिल्लीतील जेष्ठांना  याबाबत अवगत करून देण्याची पद्धत आहे,  त्यासाठी दिल्लीत आलो होतो, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिली आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांनी आज दिल्लीत राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया (Congress President Soniya Gandhi) गांधी यांच्या 10 जनपथ येथील निवासस्थानी यांची भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात तर्कवितर्क काढले जात आहेत. यावर स्वतः बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Balasaheb Thorat stated the reason for going to Delhi)

बाळासाहेब  थोरातांनी सांगितले दिल्लीत जाण्याचे कारण
शेवगाव तालुक्यात दमदार पाऊस, सालवडगाव तलाव तुडुंब

यावेळी नितीन राऊत सोनिया  गांधी यांना भेटायला का गेले असा प्रश्न विचारला असता, बाळासाहेब थोरात म्हणाले की, याबाबत त्यांनाच  विचारा. ते आमच्या एक सेलचे प्रमुख आहेत. काही चर्चा त्या निमित्ताने त्यांना करायच्या असतील. त्यामुळे सोनिया गांधींना भेटले असावेत. त्यानंतर त्यांना शिवसेना  संपर्क अभियान राबवत असल्याचे विचारण्यात आले, याला उत्तर देताना त्यांनी सांगितल की, प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आम्ही सुद्धा  राज्यात फिरणार आहोत. तीनही पक्ष आपापल्या पक्षाची ताकद वाढवत आहेत, आम्ही आघाडी  म्हणून एक आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.

विधानसभा अध्यक्षाची निवड कधी करणार असे विचारले असता, विधानसभा अध्यक्ष पदाची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ४ दिवसांची गरज असते. मात्र अधिवेशन २ दिवसांचे होते. आमदारांची  कोरोना टेस्ट करायची होती. त्यामुळे  निवडणुकीची प्रक्रिया थांबवावी लागली. तसेच आमच्यात अंतर्गत कुरबुरी नाहीत. प्रदेश कार्यकारिणीदेखील लवकरच जाहीर होईल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. आघडीचं  सरकार  बनल्यापासून  भाजपाच सरकार पडण्याचा प्रयत्न चालू आहे. आम्हाला २ वर्षे पूर्ण होत आहेत. पुन्हा आघाडीचं सरकार आले तर आश्चर्य मानू नका. भाजप कार्यकर्त्यांना सत्तेची आशा दाखवतेय. असा टोलाही यावेळी बाळासाहेब थोरातांनी यावेळी लगावला.

Edited By- Anuradha

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com