महसूल खात्यावरुन आजी-माजी मंत्र्यांमध्ये जुंपली; 'कोणतीही चौकशी करा' थोरातांचे विखेंना प्रत्युत्तर

'महसूल विभागाचं काय करायचं कोणती चौकशी लावायची तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी जरूर काय असेल त्या चौकशा कराव्यात.'
Radhakrishna Vikhe Patil Vs Balasaheb Thorat
Radhakrishna Vikhe Patil Vs Balasaheb ThoratSaam TV

अहमदनगर: अहमदनगर पोलिस परेड ग्राऊंडवर ध्वजारोहण झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी मागील काळात महसूल विभागामध्ये (Department of Revenue) काय घडलं आहे याची चौकशी करावी लागेल. मात्र, येणाऱ्या काळामध्ये पूर्वीसारखे आरोप होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे असंही विखे पाटील म्हणाले.

तर महसुल मंत्र्याच्या याच वक्तव्यावरती माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. थोरात म्हणाले, नगर जिल्ह्याला यापूर्वी नेहमी कृषीमंत्रीपद असायचं. यावेळी महसूलपद पुन्हा आलं याचा मला आनंद आहे. चांगलं काम करावे हिच अपेक्षा आहे.

ते काय बोलले असतील ते बोलले असतील, त्यांना काय कर्तृत्व दाखवायाच ते दाखवावं आता ते महसूल मंत्री झालेले आहेत. त्यांच्या विभागाचं काय करायचं कोणती चौकशी लावायची तो त्यांचा अधिकार आहे. त्यांनी जरूर काय असेल त्या चौकशा कराव्यात. शेवटी जनतेच्या हिताच्या गोष्टी त्यांनी कराव्या, थोडा काळ मिळाला आहे असंही ते म्हणाले.

Radhakrishna Vikhe Patil Vs Balasaheb Thorat
बाळासाहेब 'वंदे मातरम' म्हणायचे; शिंदे सरकारमधील मंत्र्याच्या निर्णयाचं शिवसेनेकडून समर्थन

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी शिंदे सरकारच्या खाते वाटपावर देखील वक्तव्य केलं, मंत्रिमंडळ बनायला ४० दिवस लागले, त्यानंतर अजून काही दिवस खाते वाटण्यात गेले. खाते वाटपात शिंदे गटाला जे मिळाल ते एकंदरीत काळजीचं वाटत आहे. खाते वाटप झालेल्या मंत्र्यांना त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com