टक्कल तरुणांसाठी टेन्शन! का करतायेत तरुण केसांसाठी धावाधाव?

टकलू नवरा नको ग बाई असे सांगून मुली तरुण वराला लग्नासाठी नकार देत आहेत. त्यामुळे टक्कल पडलेल्या विवाह इच्छुक तरुणाईला आणि त्याच्या पालकांना आपल्या मुलाच्या लग्नाची चिंता सतावू लागली आहे.
टक्कल तरुणांसाठी टेन्शन! का करतायेत तरुण केसांसाठी धावाधाव?
Bald YouthSaam Tv

राजेश भोस्तेकर

रायगड - उच्चशिक्षण, मोठ्या पगाराची नोकरी, चांगले घरदार, जोडीला चारचाकी अशी उत्तम परिस्थिती असताना अनेक तरुणांना मुली लग्नासाठी नाकारतात. कारण आहे डोक्यावर पडलेलं टक्कल. टकलू नवरा नको ग बाई असे सांगून मुली तरुण वराला लग्नासाठी नकार देत आहेत. त्यामुळे टक्कल पडलेल्या विवाह (Marriage) इच्छुक तरुणाईला आणि त्याच्या पालकांना आपल्या मुलाच्या लग्नाची चिंता सतावू लागली आहे. त्यामुळे टक्कल (Bald) पडलेले तरुण हे आपल्या केसांबाबत उपचार घेण्यासाठी धावाधाव करू लागले आहेत. (bald in Youth big cause for tension in youth)

पुरुष असो किंवा स्त्री यांचे सौन्दर्य हे केसांवर अवलंबून असते. डोक्यावर केस नसेल तर तो व्यक्ती हा वेगळा दिसू लागतो. केस नसल्याने त्या व्यक्तीचा आत्मविश्वासही ढासळला जातो. तरुणाईमध्ये सध्या केस गळून टक्कल पडण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. केस गळून टक्कल पडणे हे आनुवंशिक आहे. तसेच जंक फूड खाणे, लाईफस्टाईल, तणाव याचाही परिणाम हा केस गळतीवर होत असतो. यामुळे कमी वयातच मुलांचे केस जाण्याचे प्रकार सुरू होतात. लग्नाचे वय येते त्यावेळी अनेक तरुणांना अर्ध टक्कल समस्येला सामोरे जावे लागते. याचा परिणाम हा त्याच्या भावी आयुष्यावरही होण्यास सुरुवात होत असल्याचे मत जाणकारांचे आहे.

हे देखील पहा -

मुलाचे शिक्षण पूर्ण झाले की चांगली नोकरी. त्यानंतर मुलाला लग्नासाठी मुली शोधण्यासाठी पालकांची धावपळ सुरू होते. मात्र मुलाला पडलेलं टक्कल ही एक महत्वाची अडचण प्रत्येकवेळी समोर उभी राहते. प्रत्येक मुलगी आपला नवरा सुंदर, उत्तम नोकरी, शिक्षत असावा पण टकला नसावा यावर ठाम असतात. त्यामुळे अनेक टक्कल पडलेली मुले ही लग्नापासून वंचित राहू लागली आहेत. मात्र आधुनिक काळात टक्कल समस्येवर उपाय असल्याने टक्कल पडणारी तरुणाई या उपायांचा आधार घेऊ लागली आहेत.

Bald Youth
PNBच्या ग्राहकांना खात्यात किमान शिल्लक रक्कम दुप्पट ठेवण्याचे बंधन

टक्कल पडणे ही एक साधी गोष्ट असली तरी समाजात फिरताना कुठे तरी कमीपणा निर्माण झालेला असतो. टक्कलमुळे विवाह होत नसल्याची एक मोठी अडचण तरुणापूढे उभी राहत आहे. यावरही हे तरुण मात करून नव्या आधुनि तंत्रज्ञानाचा वापर करून टक्कल झाकून पुन्हा पूर्वीसारखे दिसू लागले आहेत. मुलींनीही मुलाच्या टक्कल कडे न पाहता त्याचे कर्तृत्व, शिक्षण, कुटूंब, आर्थिक स्थिती याचा विचार करून आपला जीवनसाथी निवडावा असे मत वधुवर सूचक मंडळ चालवणाऱ्यांचे आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com