रेणके आयाेगाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणकेंची प्रकृती स्थिर

रेणके आयाेगाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणकेंची प्रकृती स्थिर
balkrishna renke

साेलापूर : भटके विमुक्तांचे संघटक बाळकृष्ण रेणके balkrishna renke यांची प्रकृती स्थिर आहे. अण्णांच्या प्रकृतीबद्दल वेळोवेळी सर्वांना कळविण्यात येईल अशी माहिती त्यांची कन्या पल्लवी रेणके यांनी दिली. (balkrishna-renke-admitted-in-solapur-pallavi-renke-sml80)

मार्ढी (सोलापुर) येथे अण्णा मंगळवारी (ता.20) सायंकाळी ऑनलाइन वेबिनारच्या माध्यमातून व्याख्यान देत हाेते. त्यावेळी त्यांना चक्कर आली. ते जागेवरच कोसळले. या वेबिनारमध्ये सहभागी झालेल्यांनाी समयसूचकता दाखवून तातडीने मला संपर्क केला. त्यामुळे अण्णांसाठी प्राथमिक उपचार उपलब्ध करु शकले असे पल्लवी रेणकेंनी नमूद केेले.

balkrishna renke
कोल्हापूरवासियांची चिंता वाढली; पंचगंगेचे पाणी पात्रा बाहेर

पल्लवी रेणके म्हणाल्या अण्णांना मार्ढी येथूल सोलापुरात तातडीने घरी प्राथमिक वैद्यकीय सेवा व पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था ही सर्वांच्या मदतीने मी मुंबईत राहून करू शकले. अण्णांच्या प्रकृतीबद्दल वेळोवेळी सर्वांना कळविण्यात येईल.

दरम्यान अण्णांना यापुर्वी एक हृदय विकाराचा सौम्य झटका आला होता. सोलापुरातील अश्विनी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहेत. आजचे (बुधवार) तपासणीचे अहवाल अद्याप आले नसल्याची माहिती रुग्णालय व्यवस्थापनाने दिली.

Edited By : Siddharth Latkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com