Cricket News : क्रिकेट खेळणं तरुणाच्या जीवावर बेतलं, गुप्तांगाला चेंडूचा फटका लागल्याने मृत्यू

पंढरपूर येथे क्रिकेटच्या मैदानात एक धक्कादायक घटना घडली आहे.
Vikram ganesh kshirsagar death in cricket ground
Vikram ganesh kshirsagar death in cricket groundsaam tv

पंढरपूर : येथे क्रिकेटच्या मैदानात एक धक्कादायक घटना घडली आहे. क्रिकेट (cricket) खेळताना एका तरुणाच्या गुप्तांगाला चेंडूचा फटका बसल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. विक्रम गणेश क्षीरसागर (३५) असं मृत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. ही धक्कादायक घटना आज शनिवारी घडली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तावशी येथील माणनदीच्या पात्रात क्रिकेट स्पर्धेचे (cricket tournament) आयोजन करण्यात आले होते. या दुर्देवी घटनेमुळं क्रिकेटविश्वात शौककळा पसरली आहे.

Vikram ganesh kshirsagar death in cricket ground
CWG 2022 : टीम इंडिया गोल्ड मेडलपासून फक्त एक पाऊल दूर, इंग्लंडला लोळवून फायनलमध्ये धडक

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम क्षीरसागर तावशी येथील माणनदीच्या पात्रात आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत सहभागी झाला होता. विक्रम या स्पर्धेत नेपतगावच्या संघासाठी क्रिकेटचा सामना खेळत होता. परंतु, सामना खेळत असताना गोलंदाजाने फेकलेल्या चेंडूचा अंदाज न आल्याने विक्रमच्या गुप्तांगाला जोरदार फटका बसला. त्यानंतर विक्रम मैदानावर खाली कोसळल्यावर त्याच्या मित्रांनी त्याला तातडीनं ढरपूर येथील एका खासगी रुग्णालायात उपचारासाठी दाखल केलं. पण,उपचारादरम्यान विक्रमचा मृत्यू झाला.

Edited By - Naresh Shende

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com