बाम्हणी- वलखेड ओढ्यात वाहून गेलेल्या दोघांना वाचवण्यात यश, एकाचा शोध सुरु

पुलावरून पुराच्या पाण्यातून मोटारसायकल टाकल्यामुळे ३ जण वाहून गेले आहेत.
बाम्हणी- वलखेड ओढ्यात वाहून गेलेल्या दोघांना वाचवण्यात यश, एकाचा शोध सुरु
बाम्हणी- वलखेड ओढ्यात वाहून गेलेल्या दोघांना वाचवण्यात यश, एकाचा शोध सुरुलक्ष्मण सोळुंखे

जालना : पुलावरून पुराच्या पाण्यातून मोटारसायकल टाकल्यामुळे ३ जण वाहून गेले आहेत. त्यामध्ये दोघांना वाचवण्यात गावकऱ्यांना यश मिळाले आहे. तर एका जणाचा शोध सुरु आहे. परतूर तालुक्यातील बामणी गावातील ही घटना, वाहून गेलेले आसाराम खालापुरे यांचा शोध सुरु आहे. घटनास्थळी तहसीलदार रूपा चित्रक, पोलिस कर्मचारी आणि ग्रामस्थ दाखल झाले आहेत.

हे देखील पहा-

मोटारसायकलही वाहून गेली आहेत. गावाचे उपसरपंच राजेंद्र खालापुरे, (वय- 35) आसाराम खालापुरे, (वय- 55) ग्रामपंचायत सदस्याचे पती आणि वालखेडचे 32 वर्षीय लखन कांबळे हे रात्री परतूरहून बामनी गावाकडे जात ही घटना घडली आहे. दिवसभर संततधार पावसामुळे बामनी गावाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद करण्यात आला होता.

बाम्हणी- वलखेड ओढ्यात वाहून गेलेल्या दोघांना वाचवण्यात यश, एकाचा शोध सुरु
Rain Update; जिल्ह्यात पुन्हा पावसाची हजेरी, मांदळा लघु प्रकल्प ओव्हरफ्लो...

रात्री पुलावरून पाणी वाहत असल्याने तिघांनी एक मेकाला धरून पूल ओलांडण्याचा निर्णय घेतला. आसाराम खालापुरे यांचा पाण्यात जाताच पाय घसरला आणि तिघेजण ही पाण्यात पडले आणि पाण्यात वाहून गेले आहेत. त्यामध्ये दोन जणांना वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले. ते बेपत्ता झालेले आसाराम खालापुरे यांचे रात्री पुलावरून आणि नदीमध्ये उशिरापर्यंत शोध घेण्याची प्रक्रिया सुरूच आहे.

Edited By- Digambar Jadhav

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com