
कोल्हापूर : महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या अनिष्ट प्रथेवर म्हणजे पतीच्या निधनानंतर विधवा (Widow) समजून तिची आभूषणे काढणे, कुंकू पुसणे यांसह अन्य प्रकारे छळ करण्याची प्रथा बंद करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur District) हेरवाड ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असून याबाबतचा ठराव हेरवाडच्या ग्रामसभेत संमत करण्यात आला आहे
माणसाचं मरण कुणाच्याच हातात नसतं, पण एकदा माणूस जगातून गेला की त्याच्या जोडीदाराला विशेषतः पत्नी असेल तर तिला अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. समाजात सन्मान राहत नाही. आभूषणे काढावी लागतात. बांगड्या फोडाव्या लागतात, रंगीत कपडे घालण्यावरही बंधने येतात अशा अनिष्ट प्रथेला अनेक महापुरूषांनी विरोध करून सुद्धाही प्रथा तशीच आहे. ही प्रथा बंद करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड (Herwad) या ग्रामपंचायतीन थेट ग्रामसभेत ठराव केला आहे.
या ग्रामपंचायतीने एखाद्या महिलेच्या पतीच निधन झाल तर त्या महिलेने कोणतीही बंधन पाळू नये, समाजातील सर्वच सभारंभाना तिला सन्मानाने उपस्थित राहता येईल. असा निर्णय घेतला आहे. तसंच हा निर्णय महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतीला दिशादर्शक असून ही चळवळ देशभर पोचणं गरजेचं आहे. त्याबाबतचा कायदा करावा अशी देखील मागणी हेरवाडच्या सरपंचांनी केली आहे.
कोल्हापूर जिल्हा हा पहिल्यापासून समाज सुधारणांच्या चळवळींमध्ये सक्रीय आहे. शाहू महाराजांचा वारसा या जिल्ह्याने पहिल्यापासून जपल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच आता कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावाने जो निर्णय घेतला आहे त्यामुळे कोल्हापूर करांची समाज सुधारनेची परंपरा अजून सुरु असल्याचं दिसून य़ेत आहे.
Edited By - Jagdish Pati
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.