बंडातात्या कराडकर पोलिसांच्या नजरकैदेत; अनुयायी पंढरीत दाखल!

यंदाच्या पालखी सोहळ्यामध्ये नियमांचे पालन करून वारकऱ्यांना पंढरपूर-आळंदी पायी वारी करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी केली होती.
बंडातात्या कराडकर पोलिसांच्या नजरकैदेत; अनुयायी पंढरीत दाखल!
बंडातात्या कराडकर यांचे अनुयायीभारत नागणे

पंढरपूर: ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर (Banda Tatya Karadkar) सातारा पोलीसांच्या (Satara Police) नजर कैदेत असले तरी त्यांच्या अनुयायींनी मात्र पोलीसांना चकवा देत आळंदी पंढरपूर ‌आषाढी‌‌ पायी वारी पूर्ण केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर (coronavirus) यंदाचा आषाढी पालखी सोहळा प्रशासनाने रद्द केलेला आहे.

राज्य शासनाने यासंदर्भात आषाढी पालखी सोहळा आणि आषाढी यात्रे संदर्भात नियमावली तयार केली आहे. यामध्ये आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी मानाच्या दहा पालख्यांना पंढरपूरमध्ये येण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार प्रमुख दहा संतांच्या पालख्यांमधील सुमारे चारशे वारकऱ्यांच्या उपस्थितीत आषाढी एकादशीचा प्रतिकात्मक पद्धतीने सोहळा साजरा केला जाणार आहे.

बंडातात्या कराडकर यांचे अनुयायी
तेरणा नदी पात्रात आढळला समीरचा मृतदेह; लासोन्यातील रसाळांचा शाेध सुरुच

यंदाच्या पालखी सोहळ्यामध्ये नियमांचे पालन करून वारकऱ्यांना पंढरपूर-आळंदी पायी वारी करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी ज्येष्ठ किर्तनकार बंडा तात्या कराडकर यांनी केली होती. परंतु, राज्य सरकारने त्यांची ही मागणी धुडकावून लावत, वारीवर ‌निर्बंध घातले आहेत. तरी ही बंडातात्या कराडकर हे पायी दिंडी काढण्यावर ठाम होते. त्यांनी पायी दिंडी काढण्याचा प्रयत्न ही केला. पण पोलीसांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर पोलीसांनी कराडकर यांना‌ ताब्यात घेतले. सध्या बंडा तात्या कराडकर हे पोलिसांच्या नजर कैदेत आहेत.

तरी ही त्यांच्या अनुयायी व व्यसन मुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पायी आषाढी वारी पूर्ण केली.‌आज सकाळी बंडा तात्या कराडकर यांचे अनेक अनुयायी व वारकरी पंढरीत दाखल झाले.‌ चंद्रभागा नदीचे स्नान, नामदेव पायरीचे आणि कळसाचे दर्शन घेवून बंडा तात्या कराडकर यांच्या अनुयायांनी वारी पूर्ण केली.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com