गैरबंजारा नागरीकांना बंजारा जातीचे प्रमाणपत्र!जालन्यातील धक्कादायक प्रकार

जालन्याच्या उपविभागीय कार्यालयातून देण्यात आले बंजारा जातीचे प्रमाणपत्र, प्रमाणपत्र घेणाऱ्या नागरीकांसह प्रमाणपत्र वाटप करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची आमदार राजेश राठोड यांची मागणी.
गैरबंजारा नागरीकांना बंजारा जातीचे प्रमाणपत्र!जालन्यातील धक्कादायक प्रकार
गैरबंजारा नागरीकांना बंजारा जातीचे प्रमाणपत्र!जालन्यातील धक्कादायक प्रकार लक्ष्मण सोळुंके

जालना : गैरबंजारा समाजाच्या नागरीकांना बंजारा जातीचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार जालन्यात उघडकीस आला आहे. बंजारा समाजाच्या नागरिकांकडून या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत असून जालन्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून हे प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती सोशल मीडियावरून व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा -

विशाल मोरे, किशोर भिडे यांच्यासह आणखी दोन जणांच्या नावानं हे प्रमाणपत्र देण्यात आले असून आणखी किती जणांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहे याविषयीची सखोल चौकशी करून बंजारा समाजाच्या नावाने प्रमाणपत्र घेणाऱ्या नागरिकांसह प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे आमदार राजेश राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

गैरबंजारा नागरीकांना बंजारा जातीचे प्रमाणपत्र!जालन्यातील धक्कादायक प्रकार
अजित पवार यांना केवळ पैसा कळतो : चंद्रकांत पाटील

शिवाय विधिमंडळात याप्रकरणी प्रश्न उपस्थित करणार असून दोषींवर कारवाईची मागणी करणार असल्याच देखील राठोड यांनी म्हटलं आहे. दरम्यान, बंजारा समाजातील काही कार्यकर्त्यांनी आज या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं असून दोषींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. मात्र प्रशासनातील कोणताही अधिकारी याबाबत माध्यमांशी बोलायला तयार नाही.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com