50 लाखाचा गांजा जप्त, पुणे-सोलापूर महामार्गावर यवत पोलिसांची कारवाई

पुणे-सोलापूर महामार्गावर पोलिसांनी तब्बल 50 लाखांचा गांजा जप्त केला आहे.
50 लाखाचा गांजा जप्त
50 लाखाचा गांजा जप्तSaam Tv

बारामती : पुणे-सोलापूर महामार्गावर पोलिसांनी तब्बल 50 लाखांचा गांजा जप्त केला आहे. दौंड तालुक्यातील पाटस गावाजवळ यवत पोलिसांनी गांजा तस्करी करणाऱ्या टोळीला पकडले आहे. यावेळी पोलिसांनी 50 लाखाचा गांजा जप्त केला आहे. यवत पोलिसांनी पाटस गावच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री एक मालवाहतूक ट्रक ताब्यात घेतला आहे. (Baramati crime news 50 lakh marijuana seized by Yavat police)

यवत पोलिसांनी (Yavat Police) या ट्रकची तपासणी केली असता यात सुमारे 50 लाख रुपये किमतीचा गांजा (Marijuana) आढळून आला. यामध्ये पोलिसांनी जवळपास 10 पेक्षा अधिक आरोपींना ताब्यात घेतले असून रविवारी सकाळी यवत पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -

50 लाखाचा गांजा जप्त
गळा दाबून 13 वर्षीय चिमुकल्याचा खून, निर्दयी बाप जेरबंद; गाव हळहळले

हा गांजा परराज्यातून पुणे जिल्ह्यातील काही दुकानात आणि मुंबईत विक्रीसाठी आणण्यात येणार असल्याचा संशय पोलिसांना आला. याप्रकरणामुळे जिल्ह्यातील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे.

50 लाखाचा गांजा जप्त
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या दोन महिला चोर जेरबंद!

बारामतीत दोन गावठी पिस्टलसह तीन जिवंत काडतुसे जप्त

बारामती पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विक्रीसाठी आणलेली दोन पिस्टल आणि तीन जिवंत काडतुसे पोलिसांनी पकडली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्मराज वाघमारे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 50 हजार रुपये, दोन पिस्टल, तीन जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा 4 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Edited By - Nupur Uppal

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com