पर्यटन बुकिंगच्या ऑफिसमधील महिलेवरतीच चाकूहल्ला; बारामतीमधील धक्कादायक घटना

महिलेने आरोपीचा हात धरला असता, आरोपीने माझा हात सोड असे म्हणून त्याने हातावर चाकूचा वार करून तो पळून गेला आहे. त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु तो आपली चप्पल न घालताच गाडीवर बसून पसार झाला.
पर्यटन बुकिंगच्या ऑफिसमधील महिलेवरतीच चाकूहल्ला; बारामतीमधील धक्कादायक घटना
पर्यटन बुकिंगच्या ऑफिसमधील महिलेवरतीच चाकूहल्ला; बारामतीमधील धक्कादायक घटनामंगेश कचरे

बारामती : बारामती शहरातील नीरा डावा कालवा शेजारी असणाऱ्या पूर्वाकॉर्नर कॉम्प्लेक्समध्ये असणाऱ्या, केसरी टूर्स च्या ऑफिसमध्ये आज सकाळी ऑफिसमध्ये पर्यटनाचे बुकिंग (Tourist booking) करणाऱ्या महिलेवर चाकूने हल्ला करण्यात केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

आज सकाळी साडेदहा वाजता शहरातील केसरीच्या रजत टूर्सचे ऑफिस उघडल्यानंतर हा तरुण ऑफिसमध्ये आला. 'मी काल आपल्या ऑफिसला येऊन गेलो. परंतु आपण काल ऑफिस लवकर बंद केले.' असे म्हणत या आरोपीने महिलेच्या गळ्यात हात घातला.

पर्यटन बुकिंगच्या ऑफिसमधील महिलेवरतीच चाकूहल्ला; बारामतीमधील धक्कादायक घटना
आधार कार्डद्वारे होणारी फसवणूक कशी टाळावी?; आधार कार्ड लॉक-अनलॉक कसे करायचे? जाणून घ्या

तेव्हा या महिलेने आपली सोन्याची चेन चोररतोय की काय? म्हणून या महिलेने त्या आरोपीचा हात धरला नंतर या आरोपीने माझा हात सोड असे म्हणून त्याने हातावर चाकूचा वार करून तो पळून गेला आहे. त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला परंतु तो आपली चप्पल न घालताच गाडीवर बसून पसार झाला. दरम्यान महिलेला चाकू लागल्याने त्यांच्या हाताला जखम झाली आहे यासंदर्भात बारामती शहर पोलिस स्टेशनचे (Baramati City Police Station) पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन येथील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज काढून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com