उन्हाची तीव्रता वाढली; तापमानात दोन अंशाने वाढ

उन्हाची तीव्रता वाढली; तापमानात दोन अंशाने वाढ
उन्हाची तीव्रता वाढली; तापमानात दोन अंशाने वाढ
TemperatureSaam tv

बारामती : गेल्‍या काही दिवसांपासून बारामती परिसरामध्ये उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली आहे. तापमानात दोन अंशाने वाढ झाल्‍यामुळे नागरिकांना उन्हाच्या तीव्रतेचा आणि ऊकाड्याचा सामना करावा लागत आहे. (baramati news intensity of the sun increased A two degree increase in temperature)

Temperature
चार तासांचा रेस्क्यूनंतर विहिरीत पडलेल्या बिबट्याला काढले बाहेर

बारामतीमध्ये (Baramati) मंगळवारी तापमान 38 अंशावर गेले होते. तर आज तापमानात दोन अंशाने वाढ होऊन तापमान हे 40 अंशावर गेल्याने उन्हाची तीव्रता चांगलीच वाढली आहे. यामुळे नागरिकांना तीव्र उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याच बरोबर थंडावा देणाऱ्या फळांना मागणी वाढली असून आईस्क्रीम, लिंबू सरबत, उसाचा रस अशा ठिकाणी थंड पेय पिण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

रस्‍ते पडले ओस

उन्‍हाच्‍या झळा चांगल्‍याच जाणवत असल्‍याने उन्हाच्या तीव्रतेने बारामती शहरांमध्ये वाहतूक देखील मंदावली आहे. विशेष म्‍हणजे रस्ते काहीशे ओस पडल्याचे चित्र देखील दुपारच्यावेळी पाहायला मिळाले.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com