धक्‍कादायक..छेडखानीच्‍या त्रासाने नववीतील मुलीची आत्महत्या

छेडखानीच्‍या त्रासाने नववीतील मुलीची आत्महत्या
Suicide
Suicidesaam tv

बारामती : बोरी (ता. इंदापूर) येथे गावातील तीन मुलांच्या छेडछाडीला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सिद्धी गजानन भिटे असे आत्महत्या (Suicide) केलेल्या मुलीचे नाव आहे. (baramati news Suicide of a ninth standerd girl due to three boy harassment)

Suicide
Bribe: शेड बांधणीच्‍या कामासाठी लाच; कनिष्‍ठ लिपीक ताब्‍यात

नववीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास तिने घरात गळफास घेतल्याचा प्रकार उघड झालाय. रात्री उशीरा या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मुलीचे वडील गजानन भिटे यांनी पोलिसांकडे (Police) फिर्याद दाखल केली. मुलीने चिठ्ठी (Suicide Note) लिहून आत्महत्या केल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी याची गंभीर दखल घेत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा केला गुन्हा दाखल केला आहे.

चिठ्ठीत केले आहे नमुद

गावातील तीन मुलांच्या छेडछाडीमुळे कंटाळून जाऊन तिने आत्महत्या केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला. सदर मुलीने आई-वडिलांच्या प्रतिमेला धक्का लागू नये; म्हणून आत्महत्या करत असून ‘आब्या’मुळे आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले आहे. ही चिठ्ठी पोलिसांना आणि नागरिकांना मिळाली. गावातील तीन मुले या मुलीची छेडछाड करत होती अशी माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तिघा मुलांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com