बार्टीला निधी कमी पडू देणार नाही : धनंजय मुंडे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) या संस्थेला 91.50 कोटी रुपयांचा निधी आज वितरित करण्यात आला असून, बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे.
बार्टीला निधी कमी पडू देणार नाही : धनंजय मुंडे
बार्टीला निधी कमी पडू देणार नाही : धनंजय मुंडे SaamTvNews

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) या संस्थेला 91.50 कोटी रुपयांचा निधी आज वितरित करण्यात आला असून, बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या कोणत्याही योजनेला निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे. महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक देखभाल समिती करता 1.50 कोटी आणि बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रम व कार्यशाळा आदींसाठी 90 कोटी असा एकूण 91.50 कोटी रुपयांचा निधी स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात आला आहे.

प्रसार माध्यमांमध्ये तसेच समाजमाध्यमांद्वारे बार्टीच्या योजना बंद पडणार अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध होत असून, यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे मुंडेंनी स्पष्ट केले आहे. बार्टीची प्रत्येक योजना तळागाळातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी असून यांपैकी कोणतीही योजना बंद पडणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, बार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजना, प्रशिक्षण कार्यक्रम यांची सद्यस्थिती जाणून घेत काही नवीन योजना देखील आखण्यात येत आहेत, याबाबत बार्टी स्तरावर लवकरच एक सर्वंकष बैठक घेण्यात येणार आहे असेही मुंडें यांनी स्पष्ट केले आहे.

हे देखील पहा :

दरम्यान, राज्यातील विविध संघटनांनी बार्टी संस्थेला राज्य सरकारकडून दुय्यम वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप केला होता. बार्टी या स्वायत्त संस्थेमार्फत अनुसूचित जातीतील व नवबौद्ध नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांकरिता विविध प्रकारच्या ५९ योजना राबवण्यात येतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून बार्टीला भरीव निधी राज्य शासनाकडून देण्यात येत नसल्याचा आरोप करत उद्या मंगळवार (१४ सप्टेंबर) रोजी आंदोलनाचा इशारा स्टुडंट हेल्पिंग हॅन्ड्स संस्थेचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी दिला होता. मात्र, आजच शासनाकडून निधी वितरणाचा शासन निर्णय काढण्यात आल्याने निर्णयाचे स्वागत करून विदयार्थी व समाजातील एकजूटीचा हा विजय असल्याचे म्हटले आहे. बंद अवस्थेत असलेल्या योजना तातडीने कार्यान्वित करून योजनांची जलद अंमलबजावणी करावी बार्टीतील सर्व विभागांचे समाजिक लेखापरीक्षण करण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच, बार्टीसाठी निधी मंजूर होऊन सर्व योजना पूर्ववत व्हाव्यात यासाठी सर्व विद्यार्थी प्रतीक्षेत होते. मात्र, आंदोलनाची भुमिका घेतल्यानंतर शासनाने याचे आंभीर्य ओळखले व तात्काळ निधी जाहीर केला. याबाबद्दल सामाजिक न्यायमंत्री धंनजय मुंडे यांचे आभार व हा निधी कसा खर्च होणार यासंदर्भात उदयाच बार्टीच्या महासंचालकाशी चर्चा करणार असल्याची प्रतिक्रिया, सामाजिक कार्यकर्ते आनंद जाधव यांनी दिली आहे.

बार्टीला निधी कमी पडू देणार नाही : धनंजय मुंडे
Breaking |झोपलेल्या चिमुकलीच्या गळ्याला नागाने वेटोळा घातलेला हा VIDEO पहाच
बार्टीला निधी कमी पडू देणार नाही : धनंजय मुंडे
Bhiwandi Rape Case : भिवंडीत काकाने केला १६ वर्षीय पुतणीवर बलात्कार!

बार्टी संस्थेस कोरोना काळातील आर्थिक संकटात सुद्धा तातडीने 91.50 कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धन्यवाद व्यक्त केले. महाविकास आघाडी सरकारने अनुसूचित जातीतील आर्थिक दुर्बल कुटुंबातील दहावीच्या परीक्षेत 90% पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पुढील दोन वर्षे प्रत्येकी 1 लाख रुपये देण्याबाबतची योजना बार्टी मार्फत सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी प्रक्रिया सुरू असून या योजनेप्रमाणे आणखी काही नवीन योजना देखील सुरू करण्यात आल्या तर काही योजना प्रस्तावित असून कोणत्याही योजनेच्या निधीला धक्का लागणार नाही व कोणत्याही स्थितीत निधी कमी पडू दिला जाणार नाही, असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

हेही वाचा :

बार्टीला निधी कमी पडू देणार नाही : धनंजय मुंडे
Breaking : Sakinaka Rape Case : ऍट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल
बार्टीला निधी कमी पडू देणार नाही : धनंजय मुंडे
Crime : प्रेमात धोका दिल्याने महिलेने केली प्रियकराची साखरपुड्या दिवशी हत्या!

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com