४० कोटींच्या फसवणुक प्रकरणात विशाल फटे कुटुंब अडचणीत; आईसह पत्नीचा अटकपूर्व जामीन फेटाळला

आतापर्यंत १४० गुंतवणूकदारांची सुमारे ४० कोटींपर्यंतची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
४० कोटींच्या फसवणुक प्रकरणात विशाल फटे कुटुंब अडचणीत; आईसह पत्नीचा अटकपूर्व जामीन फेटाळला
CourtSaam Tv

सोलापूर : बार्शीचा हर्षद मेहता म्हणून समोर आलेला आणि बार्शीसह संपूर्ण राज्यातील नागरिकांना सुमारे ४० कोटींचा गंडा घालणाऱ्या विशाल फटे याला बार्शीच्या विशेष न्यायालयाने (court) दणका दिला आहे. या प्रकरणातील संशयित असलेले त्याची पत्नी (wife) आणि आईचा (mother) अटकपूर्व जामीन अर्ज बार्शी (barshi) न्यायालयाने फेटाळून लावला. त्यामुळे फटेच्या अडचणीत वाढ झाली आहे. (solapur latest marathi news)

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी प्रलोभन दाखवून विशाल फटे यांनी बार्शीसह राज्यभरातील नागरिकांकडून कोट्यवधी रुपये गोळा केले आहेत. त्यासाठी त्याने बार्शीसह पुण्यातही कार्यालये थाटली होती. यामध्ये अनेक बड्यांची नावेही आहेत. या फसवणूक प्रकरणी विशाल फटे याच्यावर जानेवारी २०२२ मध्ये बार्शी पोलिसांत (barshi police station) गुन्हा दाखल झाला होता.

Court
आठवड्यानंतर शासकीय कर्मचारी होणार मालामाल; माेदी सरकार घेणार माेठा निर्णय?

दिपक आंबुरे यांच्या तक्रारीनंतर पाेलीसांनी मुख्य सूत्रधार विशाल फटे याच्यासह त्याची पत्नी राधिका फटे, वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे आणि अलका फटे यांच्याविरुध्द जानेवारी महिन्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात फटे याची पत्नी व आईने न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल हाेता. हा अर्ज विशेष न्यायालयाचे न्यायाधिश एल. एस. चव्हाण यांनी फेटाळला.

Edited By : Siddharth Latkar

Court
संकट काळात परिवहन मंत्री स्वत: बनले नाविक; रुग्णास पाेहचविले दवाखान्यात (व्हिडिओ पाहा)
Court
वाराणसीतून आंध्रला निघालेल्या कारला अपघात; एक ठार, सात जखमी
Court
Satara: दराेडेखाेराचा पाेलीसांवर हल्ला; एलसीबीच्या पथकाने जीवाची पर्वा न करता केले त्याला जेरबंद

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com