उशिरा आलेल्या बीडीओंचा पुष्पहार घालत अनोखा सत्कार...!
उशिरा आलेल्या बीडीओंचा पुष्पहार घालत अनोखा सत्कार...!विनोद जिरे

उशिरा आलेल्या बीडीओंचा पुष्पहार घालत अनोखा सत्कार...!

आमरण उपोषण आणि ठिय्या सुरू असतांना देखील संबंधित बीडीओ यांनी कसलीही दखल घेतली नाही.

बीडच्या पाटोदा पंचायत समिती समोर अतिक्रमण हटावची मागणी घेऊन, वंचित बहुजन आघाडीचे आमरण उपोषण सुरू आहे. मात्र या आमरण उपोषणाची संबंधित प्रशासनाने दखल न घेतल्याने, संतप्त झालेले वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शिवराज बांगर यांच्यासह कार्यकर्त्यांनी, बीडीओ अंनत्रे पी.डी यांच्या दालनात, दोन तास ठिय्या दिला.

आमरण उपोषण आणि ठिय्या सुरू असतांना देखील संबंधित बीडीओ यांनी कसलीही दखल घेतली नाही. यामुळे अनेक वेळा फोन करून देखील ते पंचायत समिती कार्यालयात येण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप आंदोलन कर्त्यांनी केला होता. मात्र जोपर्यंत बीडीओ येत नाही तोपर्यंत या दालनातून उठणार नाहीत, असा पवित्रा घेतल्यानंतर अखेर बीडीओ पंचायत समितीत दाखल झाले होते यावेळी आंदोलनकर्त्यांनी उशिरा आलेल्या बीडीओ यांना पुष्पहार अर्पण करून घालून त्यांचा सत्कार केला.

उशिरा आलेल्या बीडीओंचा पुष्पहार घालत अनोखा सत्कार...!
मुंडे भगिनींसाठी राजीनाम्याचे लोण बीडपाठोपाठ नगरमध्ये

दरम्यान, पाटोदा तालुक्यातील पारनेर गावांमध्ये, बुद्ध विहाराची जागा असून त्या जागेवर गावातीलच व्यक्तीने अतिक्रमण केले आहे. त्या ठिकाणी आडत दुकान सुरू केले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले अतिक्रमण, तात्काळ काढण्यात यावे. जोपर्यंत अतिक्रमण काढले जात नाही, तोपर्यंत हे आमरण उपोषण सुरूच ठेवू. असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.

दरम्यान संबंधित ग्रामपंचायतला आपण लेखी पत्र दिलं असून त्यांच्याकडून अहवाल मागवला आहे. त्यांच्यावर कारवाई करा असे देखील सांगितले आहे. मात्र अतिक्रमण काढला नाही तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. अशी प्रतिक्रिया पाटोदा पंचायत समितीचे बीडीओ पी.डी.अंनत्रे यांनी दिली आहे.

Edited By: Pravin Dhamale

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com