ऑनलाईन मद्य खरेदी करताय सावधान! महिलेचे दीड लाख लंपास

ऑनलाईन मद्य खरेदी करताय तर सावधान! फसले जाल...अन्यथा डोक्यावर हात मारण्याची वेळही येऊ शकते.
ऑनलाईन मद्य खरेदी करताय सावधान! महिलेचे दीड लाख लंपास
ऑनलाईन मद्य खरेदी करताय सावधान! महिलेचे दीड लाख लंपासSaam TV

राजेश भोस्तेकर

रायगड: ऑनलाईन मद्य खरेदी करताय तर सावधान! फसले जाल...अन्यथा डोक्यावर हात मारण्याची वेळही येऊ शकते. अलिबागमधील एका महिलेला अशीच डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे. ऑनलाईन मद्य खरेदीत या महिलेची दीड लाखाची फसवणूक झाली आहे. त्यामुळे या महिलेला पोलिसांकडे धाव घ्यावी लागली आहे. अलिबाग पोलीस ठाण्यात फसवणूक झालेल्या महिलेने तक्रार दाखल केली आहे. याबाबत अलिबाग पोलिसांकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ऑनलाईन मद्य खरेदी करताय सावधान! महिलेचे दीड लाख लंपास
महाविद्यालयाचा गलथान कारभार! पेपर दिला गणिताचा गुण आले जीवशास्त्राचे

अलिबागमधील एका महिलेच्या कुटूंबात लग्न ठरले होते. लग्न सोहळ्यात हळदी समारंभात येणाऱ्या पाहुण्यांसाठी मद्याची व्यवस्था करायची होती. यासाठी महिलेने पीके वाईन्स या पेजवर जाऊन मद्याबाबत माहिती घेतली. या पेजवर असलेल्या मोबाईल नंबरवर महिलेने फोन केला. त्याच्यात बोलचाली होऊन मद्याचा व्यवहार ठरला. त्यानंतर समोरच्या व्यक्तीने महिलेला आपल्या खात्याची माहिती देऊन ऑनलाईन पैसे पाठविण्यास सांगितले. महिलेने आधी 25 हजार रुपये ऑनलाईन खात्यात पाठविले. मात्र पैसे पोहचले नाहीत असे समोरच्या व्यक्तीने कालवून दुसरा खाते नंबर देऊन महिलेच्या खात्यात 10 रुपये पाठविले. त्यानंतर पुन्हा महिलेने पैसे पाठविले. महिलेचा विश्वास संपादन करून वारंवार असे 1 लाख 44 हजार रुपये खात्यात जमा करवून घेतले.

महिलेला 60 हजाराचे मद्य खरेदी करायचे होते. मात्र तिने 1 लाख 44 हजार रुपये ऑनलाईन खात्यात जमा केले. पैसे देऊनही मद्य मात्र घरी आले नाही. त्यामुळे परत स्वतःकडे असलेल्या मोबाईलवर फोन केला मात्र तो बंद होता. आपण फसलो गेल्याचे कळताच महिलेने अलिबाग पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. अलिबाग पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

ऑनलाईन खरेदी प्रमाण हे हल्ली वाढत चालले आहे. कॅश ऑन डिलिव्हरी सारखी सुविधा अनेक ऑनलाईन विक्री करणाऱ्या कंपन्या देत आहेत. असे असतानाही ही महिला भूलथापांना बळी पडली आहे. त्यामुळे हळदी साठी मागविलेले मद्य काही आले नाही उलट 1 लाख 44 हजाराची फसवणूक झाल्याने पश्चाताप करण्याची वेळ या महिलेवर आली आहे. त्यामुळे अशा भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नका आणि आपली फसवणूक होऊ देऊ नका असे आवाहन अलिबाग पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांनी केले आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com