गडचिरोलीत चार महिलांवर अस्वलाच्या कळपाचा प्राणघातक हल्ला!

गडचिरोलीत अस्वलाच्या कळपाने महिला मजुरांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Bear Attacke on woman in gadchiroli
Bear Attacke on woman in gadchirolisaam tv

गडचिरोली : येथे वन्य प्राण्यांचा मुक्त संचार वाढला (Wild Animals) असून माणसांवर प्राणघातक हल्ल्याच्या घटनाही घडताना दिसत आहेत. बिबट्या-वाघाने माणासांवर हल्ला केल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. पण, आता चक्क अस्वलाच्या कळपाने (Bear attack on woman) महिला मजुरांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गडचिरोलीत (Gadchiroli) अस्वलाने महिलांवर केलेल्या हल्ल्यामुळं येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. तेंदूपानं तोडण्यासाठी गेलेल्या चार महिलांना अस्वलाने गंभीर जखमी केलं आहे. सीमा रतिराम टेकाम (२१),लता जीवन मडावी (३५),पल्लवी रमेश टेकाम (२५) व रमशीला आनंदराव टेकाम (३८)अशी जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत.दरम्यान, कुरखेडा तालुक्यातील दादापूर जवळच्या कोहका राऊंड कक्ष क्रमांक ४४७ अंतर्गत कवऱ्याल-झट्याल जंगलात ही घटना घडली आहे.

Bear Attacke on woman in gadchiroli
गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानाची पत्नी बनली लष्करी अधिकारी; पतीचं स्वप्न केलं पूर्ण

याबाबत सविस्तर वृत्त असं की, गडचिरोलीत अस्वलाच्या कळपाने महिला मजुरांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर अस्वलाने हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत.त्यानंतर महिलांनी आरडाओरडा करून कळपाला पळवून लावले.ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेद्वारे चारही जखमी महिलांना रुग्णालयात दाखल केले.या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com