Beed: लज्जास्पद! नात्याला काळिमा, जन्मदात्या बापानेच केला 12 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

बीडच्या रेवकी देवकी गावातील घटनेने नात्याला काळिमा...
Crime News
Crime News saam tv

बीड - मुलगी आणि वडील या नात्याला काळिमा फासणारी घटना आहे. मुलगी अपंग असल्याचा फायदा घेते जन्मदात्या बापानेच मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.10 वर्षीय अपंग असणाऱ्या चिमुकलीवर, 55 वर्षीय जन्मदात्या बापानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक आणि संतापजनक घटना बीडच्या (Beed) रेवकी देवकी गावात घडली आहे. (Beed Crime News)

Crime News
Petrol Diesel: आज पेट्रोल आणि डिझेल स्वस्त की महाग? तुमच्या शहराचे इंधन दर जाणून घ्या

रतन गोरे वय 55 ,रा .रेवकी देवकी असे नराधम आरोपी बापाचे नाव आहे. आरोपी रतन गोरे याने, काल दुपारी आपल्या राहत्या घरी, पोटच्या अपंग मुलीवर लैंगिक अत्याचार केला. काल सायंकाळच्या दरम्यान ही घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आता पोलिसांनी या प्रकरणी कडक कारवाई करावं कशी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, पीडितेवर सुरुवातीला गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले मात्र पीडितेची प्रकृती नाजूक असल्याने तिला पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या पीडितेवर उपचार सुरु आहे.

या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बीडच्या गेवराई पोलीस ठाण्यात नराधम बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने बीड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com