Beed: डॉक्टर नव्हे, देवदूत...! रुग्णसेवेसह माणुसकी जोपासणारं रुग्णालय

परराज्यातील जखमी रुग्णांसाठी जेव्हा जिल्हा रुग्णालयातील बेडलाचं बनवतात सलूनची खुर्ची
Beed: डॉक्टर नव्हे, देवदूत...! रुग्णसेवेसह माणुसकी जोपासणारं रुग्णालय
Beed: डॉक्टर नव्हे, देवदूत...! रुग्णसेवेसह माणुसकी जोपासणारं रुग्णालयविनोद जिरे

बीड: आजपर्यंत आपण रुग्णाला उपचार देणारे अनेक रुग्णालय (Hospital) आणि डॉक्टर पाहिले असतील. मात्र, आज आम्ही आपण देखील असच एका शासकीय जिल्हा रुग्णालय (Hospital) बघणार आहोत. जिथं रुग्णसेवा तर केलीच जाते, मात्र तिथं माणुसकी देखील जोपासताना दिसून येणार आहे. गेल्या महिन्यांभरापूर्वी एका पोलीस (Police) कर्मचाऱ्याने, एका मनोरुग्ण अवस्थेतील जखमी व्यक्तीला, जिल्हा (District) रुग्णालयात दाखल केले होते. हा दाखल होताचं तेथील डॉक्टर आणि आरोग्य सेवा (Healthcare) देणाऱ्या सिस्टरसह ब्रदरची चांगलीच तारांबर उडाली. त्याला कारणही तसेच आहे. कारण दाखल करण्यात आलेला रुग्ण हा परराज्यातील आहे. त्याला आपण काय बोलतोत? हे समजत नाही..आणि तो काय बोलतोय ? हे इतरांना समजत नाही. त्यामुळे त्याला झालंय काय? हे समजणं अवघड झाले आहे.

हे देखील पहा-

मात्र, सीएस डॉ. डॉक्टर सुरेश साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सुरेश साबळे आणि इतर डॉक्टरांसह सिस्टर आणि ब्रदरनी त्याला उपचार देत काळजी घेतली. एवढेच नाही तर चक्क जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, डॉ. सुधीर राऊत यांच्यासह सिस्टर आणि ब्रदरच्या माध्यमातून, त्याची वाढलेली दाढी आणि कटिंग देखील करण्यात आली. यावेळी त्यांनी बेडलाच सलूनच्या दुकानातील जणूकाही खुर्ची बनवली होती. याविषयी सीएस डॉ. सुरेश साबळे म्हणाले, की या रुग्णाला मागच्या महिन्यात अपघातात (accident) मार लागल्याने आमच्याकडे ॲडमिट करण्यात आले होते. त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Beed: डॉक्टर नव्हे, देवदूत...! रुग्णसेवेसह माणुसकी जोपासणारं रुग्णालय
Beed: डॉक्टर नव्हे, देवदूत...! रुग्णसेवेसह माणुसकी जोपासणारं रुग्णालयविनोद जिरे

परंतु, त्याला आपली भाषा कळत नाही, कुठला आहे हे सांगताही येत नाही. तो अनोळखी असून त्याच्याबरोबर कोणीही नातेवाईक नाही. या दरम्यान त्याला मी पाहिलं असता, यावेळी त्याची कटिंग आणि दाढी वाढलेली दिसली. त्यामुळे मला पहिल्यापासूनच रुग्णसेवेची आवड असल्याने, मी नाहव्याला बोलावलं आणि त्याची इथेच दाढी व कटिंग करण्यात आली. त्याचबरोबर आरोग्य विभागातील डॉक्टर, सिस्टर, ब्रदर त्याची व्यवस्थित काळजी घेत असतात. तो कुठला आहे याची माहिती घेणे सुरू असून, त्याला कुठली भाषा अवगत आहे. हे देखील माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर विविध माध्यमातून ट्रेस करून त्याचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. अशी माहिती डॉक्टर सुरेश साबळे यांनी यावेळी दिली आहे.

याविषयी डॉक्टर सुधीर राऊत यांनी म्हणाले की मागच्या एक महिन्यापूर्वी एक अनोळखी व्यक्ती, रुग्णालयात ऍडमिट झाला होता. त्याला आपली भाषाही येत नाही. तरी देखील त्याच्यावर सुरुवातीपासूनच उपचार चालू केले आहे. त्याच्या आरोग्याची, स्वच्छतेची काळजी घेत आहोत. मात्र, आज माननीय जिल्हा शल्य चिकित्सक राऊंडवर आले असता, त्यांना दाढी आणि कटिंग वाढलेली दिसली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी त्याच्याशी संवाद करून त्याची दाढी आणि कटिंग करण्याचे ठरवले. वेळोवेळी सीएस यांच्या सल्ल्यानुसार त्याला औषध उपचार दिला जातो. त्याच्या जेवणाची खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था, नर्सिंग केअर हे केले जाते.

Beed: डॉक्टर नव्हे, देवदूत...! रुग्णसेवेसह माणुसकी जोपासणारं रुग्णालय
Gadchiroli Crime: राष्ट्रवादी आमदाराच्या सुरक्षा रक्षकाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या
Beed: डॉक्टर नव्हे, देवदूत...! रुग्णसेवेसह माणुसकी जोपासणारं रुग्णालय
Beed: डॉक्टर नव्हे, देवदूत...! रुग्णसेवेसह माणुसकी जोपासणारं रुग्णालयविनोद जिरे

परंतु, त्याच्या दाढी आणि कटिंग करण्याचे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी आम्हाला आदेश दिल्याने, त्याप्रमाणे आम्ही आज त्याची दाडी आणि कटिंग करून, त्याचा एक लूक बदलण्याचा प्रयत्न केला नाही. दरम्यान रुग्णांप्रती आपलं कर्तव्य बजावत, त्याचबरोबर निराधारांना आधार देण्याचे काम, बीड जिल्हा रुग्णालयात डॉक्टर सुरेश साबळे यांच्या माध्यमातून सुरू आहे. दरम्यान परराज्यातील रुग्णाला आपली भाषा येत नसतानाही, त्याच्या विषयीची आत्मीयता आणि समाजाप्रती असलेली माणुसकीची, याचं उत्तम उदाहरण बीड जिल्हा रुग्णालयात समोर आले आहे. त्यामुळे याचा आदर्श इतर रुग्णालयाने घेतला तर सर्वसामान्य रुग्णांना चांगली आरोग्यसेवा मिळेल. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

Edited By- Digambar Jadhav

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com