Beed Accident: बीड-परळी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव कंटनरने रिक्षाला उडवलं; आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू

Beed Accident News: भरधाव कंटेनरने ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.
Beed Parali Highway Major Accident Container collides with rickshaw mother and two children died on the spot
Beed Parali Highway Major Accident Container collides with rickshaw mother and two children died on the spotSaam TV

Beed Accident News: बीड जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने ॲपे रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की यामध्ये आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. बीड -परळी राष्ट्रीय महामार्गावरील बकरवाडी फाट्याजवळ रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास हा भयानक अपघात झाला आहे.  (Latest Marathi News)

Beed Parali Highway Major Accident Container collides with rickshaw mother and two children died on the spot
Thane News: ठाण्यात मोठी दुर्घटना, इमारतीची लिफ्ट कोसळून 6 जणांचा मृत्यू

नसरीन अजीम शेख (वय 35), नोमान अजीम शेख (वय 13) आणि अदनान अजीम शेख (वय 12) अशी मृत्युमुखी पडलेल्या माय-लेकरांची नावे आहेत. तर रिक्षाचालक अजीम शेख हा गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर खासगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहे. अपघातग्रस्त बीड शहरातील असल्याची माहिती आहे.

या घटनेनं परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील (Beed News) अजीम शेख हे आपल्या पत्नी व दोन मुलासह सकाळी थेटे गव्हाण (ता. धारूर) येथे आपल्या सासरवाडीला गेले होते. रात्री परत येत असताना बकरवाडी फाटा येथे समोरून येत असलेल्या कंटेनरवरील आपला ताबा सुटला.

Beed Parali Highway Major Accident Container collides with rickshaw mother and two children died on the spot
Asia Cup 2023 IND vs PAK: पाकिस्तानला पावसाचा होणार मोठा फायदा; टीम इंडियाचं मोठं नुकसान

यामुळे समोरून येत असलेल्या रिक्षाला जोरदार धडक (Accident) बसली. अपघात एवढा भीषण होता की ॲपे रिक्षाचा अक्षरशा चुराडा झाला. या घटनेत नसरीन अजीम शेख (वय 35), नोमान अजीम शेख (वय 13 ) आणि अदनान अजीम शेख (वय 12 ) हे तिघे या अपघातामध्ये जागीच ठार झाले.

तर रिक्षा चालक अजीम शेख हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहे. सासुरवाडीवरून येणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी कंटेनरचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरू आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com