चिखलाने घेतला ट्रॅक्टर चालकाचा बळी; अंबाजोगाई येथील घटना

चिखलातील ट्रॅक्टर काढतांना हेड-ट्रालीमध्ये चेंगरून चालक ठार
Accident
AccidentSaam tv

बीड - अंबाजोगाई तालुक्यात चिखलामुळे एका ट्रॅक्टर चालकाचा बळी गेला आहे. चिखलात रुतलेल्या ट्रॅक्टर काढतांना, हेड आणि ट्रॉलीच्यामध्ये उभा असलेल्या चालकाचा अचानक हेड उचकल्याने चेंगरून मृत्यू झाला आहे. हा अपघाताची घटना बीडच्या (Beed) अंबाजोगाई (तालुक्यातील ममदापुर पाटोदा येथे घडली आहे. गंगाधर बळीराम तोडकर वय 42 रा. पाटोदा म. असे मृत चालकाचे नाव आहे.

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीवरून मृत गंगाधर तोडकर हे दुसऱ्याच्या शेतात टाकण्यासाठी ट्रॅक्टरमध्ये माती भरून घेऊन जात होते. या दरम्यान दोन दिवसापासून परिसरात रिमझिम पाऊस असल्याने चिखल झाला आहे. एका ठिकाणी चिखलात ट्रॅक्टरचे चाक फसल्याने ते हेड आणि ट्रॉलीच्या मध्ये उभे राहिले.

Accident
एसपी पंकज कुमावत यांची मोठी कारवाई; १० चंदन तस्करांवर गुन्हा दाखल

यावेळी अन्य एका चालकाने त्यांना तिथे उभे न राहण्याबाबत सूचित केले. मात्र खाली चिखलात पाय भरतील म्हणून गंगाधर तिथेच उभे राहिले. यावेळी अचानक हेड समोरच्या बाजूने उचलले गेल्याने हेड आणि ट्रॉलीच्या मध्ये चेंगरून गंगाधर यांचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेने ममदापुर पाटोदा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com