आंदोलन करने कर्मचाऱ्याच्या आंगलट; कंपनी मालकाने पाजले विष

कामगारांच्या पगारासंदर्भात आवाज उठवून कंपनीच्या विरोधात आंदोलन करणे, एका कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे.
आंदोलन करने कर्मचाऱ्याच्या आंगलट; कंपनी मालकाने पाजले विष
आंदोलन करने कर्मचाऱ्याच्या आंगलट; कंपनी मालकाने पाजले विषविनोद जिरे

बीड: कामगारांच्या पगारासंदर्भात आवाज उठवून कंपनीच्या विरोधात आंदोलन करणे, एका कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले आहे. आंदोलन केल्याचा राग मनात धरून, कंपनी मालक सुभाष मुथा आणि इतर अधिकाऱ्यांनी मानसिक त्रास देत चक्क विष पाजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

संतोष आमले असं पीडित कर्मचाऱ्याचे नाव असून तो आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील रहिवासी आहे. संतोष यांच्यावर अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कंपनी मालकासह चार जणांवर अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधीक तपास करत आहेत.

आंदोलन करने कर्मचाऱ्याच्या आंगलट; कंपनी मालकाने पाजले विष
कल्याण PWD विभागाचा अभियंता ACBच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ पकडले

संतोष गजानन आमले असं 35 वर्षीय कर्मचाऱ्याचं नाव आहे. फिर्यादी आमले हे संतोष कॅनफॅक्स कंपनीत ऑपरेटर म्हणून काम पाहत होते. दरम्यान संतोष यांनी काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळावी म्हणून कंपनीविरोधात आवाज उठवून आंदोलन केले होते. त्याता परिणाम देखील झाला होता. कंपनीतील कर्मचाऱ्यांचा पगार देखील वाढला होता. पण कंपनीच्या विरोधात आंदोलन करणं त्याला चांगलच महागात पडलं आहे.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com