Beed APMC Election Updates: आष्टी-कडा बाजार समितीवर भाजपची एकहाती सत्ता; आमदार सुरेश धस ठरले किंगमेकर!

Beed APMC Election Updates: बीड जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बीडमधील आष्टी-कडा कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
Beed APMC Election Updates
Beed APMC Election UpdatesSaam Tv

Beed APMC Election Updates: बीड जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. बीडमधील आष्टी-कडा कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. बाजार समितीवर भाजपने एकहाती वर्चस्व मिळविले आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा बाजी मारत १८ पैकी १२ जागांवर वर्चस्व मिळवलं आहे. (Latest Marathi News)

Beed APMC Election Updates
Kharghar Heat Stroke: खारघरमधील १४ पैकी १२ जणांच्या मृत्यूबाबत धक्कादायक माहिती, शवविच्छेदन अहवाल आला समोर

तर भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांना ३ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांना मात्र या निवडणुकीत धक्का बसला आहे. आजबे यांना केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. (Breaking Marathi News)

कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठीचा नामांकन अर्ज काढून घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली आहे. एकंदरीत बाजार समितीवर सुरेश धस यांची म्हणजेच भाजपची एकहाती सत्ता आली असून बाजार समितीची राज्यातली पहिलीच बिनविरोध निवडणूक आहे.

Beed APMC Election Updates
Beed Unseasonal Rain: बीडमध्ये पुन्हा अवकाळी पावसाचा कहर; वीज कोसळून २ महिलांसह ३ बैलांचा मृत्यू

सहकार क्षेत्रातील सर्वात महत्वाचा घटक म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC Election) निवडणुकीला पाहिलं जातं. शेतकऱ्यांचा मालाची खरेदी अन् विक्री ही याच समितीच्या माध्यमातून होत असते. यामुळे येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या विधानसभा, लोकसभा अन् जिल्हा परिषदेच्या निवडणुकांवर देखील चांगलाच परिणाम होत असल्यामुळे या निवडणुका अतिशय म्हत्वाच्या मानल्या जातात.

बीड (Beed News) जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. गेल्या निवडणुकीत जवळपास ६ बाजार समितीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिली आहे. तर ३ ठिकाणी भाजपची सत्ता राहिली आहे. अशातच एक निवडणूक बिनविरोध झाल्याने आता उर्वरित निवडणूकीत कोण बाजी मारणार? याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.

Edited by - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com