Beed : मागील दोन वर्षात मनामध्ये खूप साचलंय, तुमच्या समोर मनमोकळं करायचं आहे!

दसरा मेळाव्यानिमित्त आवाहन करतांना पंकजा मुंडेंनी व्यक्त केली भावना..!
Beed : मागील दोन वर्षात मनामध्ये खूप साचलंय, तुमच्या समोर मनमोकळं करायचं आहे!
पंकजा मुंडे SaamTvNews

बीड : जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्या नंतर सावरगावघाट येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या दसरा मेळाव्याला हजारोंचा जनसागर उसळणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वतःची काळजी घेत या मेळाव्यास यावे. असे आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

हे देखील पहा :

यावेळी आवाहन करतांना त्यांनी "मागील दोन वर्षाच्या काळात माझ्या मनामध्ये बरच काही साचलं आहे, तुमच्या समोर मन मोकळं करायच आहे" अशी भावना देखील व्यक्त केली. दरम्यान, उद्या (१५ ऑक्टोबर) सकाळी खा.डॉ.प्रितम मुंडे यांच्या नेतृत्वात, दसरा मेळाव्यानिमित्त गोपीनाथ गड ते भगवान भक्तीगड अशी भव्य रॅली होणार आहे.

पंकजा मुंडे
Raigad : वाडगावकरांनी जपली 'संगीत नाच' कलेची 60 वर्षांची परंपरा!

गोपीनाथगडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या दर्शनानंतर प्रितम मुंडे सकाळी सहा वाजता रॅलीला सावरगाव घाटकडे मार्गस्थ होणार आहेत. या दरम्यान त्या सिरसाळा, तेलगाव, वडवणी, घाटसावळी, बीड, वंजारवाडी, नायगाव मयूर मार्गे रोहतवाडी, चुंबळीहुन सावरगाव घाटला पोहोचणार आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.