बीड : MIMचा माजी जिल्हाध्यक्ष निघाला दर्ग्याचा जमीन चोर; गुन्हा दाखल!

देवस्थान, दर्गा जमीन घोटाळ्यात मोठा मुस्लिम चेहरा असणाऱ्या राजकीय नेत्याच्या समावेशाने बीडमध्ये खळबळ!
बीड : MIMचा माजी जिल्हाध्यक्ष निघाला दर्ग्याचा जमीन चोर; गुन्हा दाखल!
बीड : MIMचा माजी जिल्हाध्यक्ष निघाला दर्ग्याचा जमीन चोर; गुन्हा दाखल!SaamTvnews

बीड : देवस्थान आणि वक्फ बोर्ड जमीन हडप केल्याप्रकरणी, साम टीव्हीने बातमी लावून धरल्यानंतर, आता बीड जिल्ह्यामध्ये एकापाठोपाठ एक कारवाईला सुरुवात झाली आहे. वक्फ बोर्डाने भाडेतत्त्वावर दिलेली जमीन स्वतःच्या अन वडिलांच्या नावावर करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी, एमआयएमचे (AIMIM) माजी जिल्हाध्यक्ष शेख निजाम आणि वडिल शेख जैनोद्दीन या दोघाविरोधात बीड (Beed) शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा :

बीड जिल्ह्यातील बहुतांश राजकीय पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून हजारो एकर जमीनी हडपल्या आहेत. आणि हा सर्व प्रकार साम टिव्हीने लावून धरलाय. त्यांनतर आता यातील काही प्रकरणे समोर येत असल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात एमआयएम चे माजी जिल्हा अध्यक्ष शेख निजाम यांना फोन वरून विचारल असता वडीलांपासून हे कोर्टात (Court) प्रकरण सुरू आहे. असे म्हणून यावर बोलण्यास नकार दिला.

बीड : MIMचा माजी जिल्हाध्यक्ष निघाला दर्ग्याचा जमीन चोर; गुन्हा दाखल!
हौसेला मोल नाही; जावयाला आणायला शेतकऱ्याने पाठवले चक्क हेलिकॉप्टर!

बीड शहरातील सय्यद सुलेमान साहब दर्गा बीड यांच्या संबंधित शहरातील सर्वे नं.20 इ मधील 1 एक्कर खिदमतमाश जमीन स्वतःच्या नावावर करून घेणार्‍या शेख निजाम शेख जैनोद्दीन व शेख जैनोद्दीन शेख सुजाओद्दीन यांच्या विरोधात बीड शहर ठाण्यात फसवणूक आणि वक्फ अधिनियम 1954 नुसार गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत जिल्हा वक्फ अधिकारी अमीनुज्जम खलीखुज्जम यांनी बीड शहर ठाण्यात रितसर फिर्याद नोंदवली. यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अशी माहिती उपविभागीय पोलिस (Police) अधिकारी संतोष वाळके यांनी दिली

बीड शहरातील सर्वे नं.20 मधील सय्यद सुलेमान साहब दर्गा बीड यांच्या संबंधित असलेली खिदमतमाश जमीन मराठवाडा वक्फ ऑफ बोर्ड पंचक्की यांनी 28 ऑक्टोबर 1993 साली ठराव घेवून हाजी शेख सुजाउद्दीन दादामियॉ, शेख जैनोद्दीन शेख सुजाउद्दीन व मिर्झा शफीक बेग मिर्झा उस्मान बेग यांना 14 सप्टेंबर 1994 रोजी 51 वर्षांसाठी दरवर्षी 5 हजार रूपये भाड्याने दिली होती.

बीड : MIMचा माजी जिल्हाध्यक्ष निघाला दर्ग्याचा जमीन चोर; गुन्हा दाखल!
क्या चोर बनेगा रे तू? चोराने मोबाईल चोरला खरा; मात्र स्वतःच्या चुकीने लागला पोलिसांच्या हाती!

तसेच त्यावेळी 20 रूपये किंमतीच्या बॉण्डवर 38 हजार चौरस फुट जमीन भाडे तत्वावर दिली. तसेच त्यांच्याकडून देणगी म्हणून 50 हजार रूपयांची रक्कम भरून घेण्यात आली. नंतर हाजी शेख सुजाउद्दीन यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा शेख जैनोद्दीन व त्याचा मुलगा शेख निजाम यांनी संगनमत करून 30 जून 2001 रोजी खिदमतमाश जमीन मदतमाश म्हणून फेर क्रमांक 554 अन्वये बेकायदेशीररित्या स्वतःच्या मालकीची करून घेतली.

शेख निजाम व शेख जैनोद्दीन यांनी सर्वे नं.20 इ जमीन त्यांना विश्वासाने भाडेतत्वावर दिलेली असतांना विश्वासघात करत उपजिल्हाधिकारी शेळके यांच्या नावाचा व सही शिक्क्याचा बनावट आदेश तयार करून वक्फ बोर्डाच्या मालकीची जमीन संगनमताने स्वतःच्या नावे करून तिथे बांधकाम केले म्हणून दोघांविरूध्द फसवणूक (Fraud) तसेच वक्फ अधिनियम 1954 चे कलम 52 (ए) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक निरीक्षक घनशाम अंतरप हे करत आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com