केजमध्ये उत्साहाच्या भरात जंगी मिरवणूक काढणं भोवलं; नूतन नगराध्यक्षावर गुन्हा

बीडच्या केज नगरपंचायत मधील नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षावर पदभार स्वीकारण्यापूर्वीच गुन्हा दाखल...
केजमध्ये उत्साहाच्या भरात जंगी मिरवणूक काढणं भोवलं; नूतन नगराध्यक्षावर गुन्हा
केजमध्ये उत्साहाच्या भरात जंगी मिरवणूक काढणं भोवलं; नूतन नगराध्यक्षावर गुन्हा SaamTvNews

बीड : नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडीनंतर उत्साहाच्या भरात जंगी मिरवणूक काढणं चांगलच महागात पडलंय. बीडच्या केज (Kej) नगरपंचायत मधील नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांसह जवळपास 200 जणांविरोधात जिल्ह्यात जमावबंदी आदेश मोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, पदभार स्वीकारण्यापूर्वीच गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

हे देखील पहा :

काँग्रेस (Congress) सोबत आघाडी करून जनविकास आघाडीच्या सिताताई बनसोड या केजच्या नगराध्यक्ष झाल्या आहेत. तर उपाध्यक्षपदी शीतल दांगट यांची निवड झाली. नूतन पदाधिकारी यांची निवडीनंतर शहरातून जंगी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत शेकडो लोकांचा जमाव होता. बीड (Beed) जिल्ह्यात सध्या जिल्हाधिकारी यांनी जमावबंदी आदेश लागू केले आहेत. मिरवणूक, मोर्चे आंदोलन याला बंदी आहे. मात्र, केजमध्ये ही बंदी मोडण्यात आल्याने, केज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केजमध्ये उत्साहाच्या भरात जंगी मिरवणूक काढणं भोवलं; नूतन नगराध्यक्षावर गुन्हा
'सॅड साॅंग' ऐकून नांदेडमधील तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले..!
केजमध्ये उत्साहाच्या भरात जंगी मिरवणूक काढणं भोवलं; नूतन नगराध्यक्षावर गुन्हा
'१०५ असंतुष्ट आत्मे अन् एकच संजय राऊत' सोलापुरात शिवसेनेच्या बॅनरची चर्चा!

दरम्यान, नवनिर्वाचित नगराध्यक्ष (Mayor) सिता प्रदीप बनसोड, उपनगराध्यक्ष शितल पशुपतीनाथ दांगट, जनविकास परिवर्तन आघाडीचे नेते हारून चाँदपाशा इनामदार, जेष्ठ नेते अंकुश इंगळे, नगरसेवक आदित्य अशोकराव पाटील, पशुपतीनाथ दांगट, नगरसेवक सोमनाथ गुंड, सुग्रीव माणिक कराड, नगरसेविका पल्लवी ओमप्रकाश रांजनकर, नगरसेविका पदमीन गुलाब शिंदे, शकील ईनामदार यांचा गुन्हा (Case) दाखल झाल्याने आरोपींमधे समावेश आहे. तर इतरमध्ये जवळपास 200 जणांचा समावेश आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com