बीड: अवैध गुटखाविक्री प्रकरणात शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखावर गुन्हा दाखल

अवैध गुटखा विक्री करणाऱ्या रॅकेटचा बीड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यात शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडेंवर गुन्हा दाखल झाल्यानं खळबळ उडाली आहे.
बीड: अवैध गुटखाविक्री प्रकरणात शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखावर गुन्हा दाखल
बीड: अवैध गुटखाविक्री प्रकरणात शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखावर गुन्हा दाखलविनोद जिरे

बीड: अवैध गुटखा विक्री (illegal gutka sale) करणाऱ्या रॅकेटचा बीड पोलिसांनी(Beed Police) पर्दाफाश केला आहे. यात बीड तालुक्यातील इमामपुर येथील एका गोदामावर छापा टाकून तब्बल २५ ते ३० लाख रुपयांचा गुटखा ताब्यात घेतलाय. या प्रकरणी आज केज पोलिसात शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंसह (ShivSena district chief Kundlik Khande) इतर तीन जणावर कलम ३२८,२७२, २७३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या प्रकरणात आतापर्यंत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. (Beed: Case filed against Shiv Sena district chief in illegal gutka sale case)

हे देखील पहा -

बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून या विरोधात पोलिसांनी कारवाईचे सत्र सुरू केले आहे. काल बीड परिसरातील दोन ठिकाणी छापे मारून जवळपास ३० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परंतु यातील मुख्य आरोपी सत्ताधारी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख असल्यामुळे यामध्ये गुन्हा नोंद होण्यास विलंब झाला होता. अखेर या प्रकरणात सत्ताधारी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, त्यामुळे बीडच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री शिवसेनेचे असल्याने सत्ताधारी पक्षातील जिल्हाप्रमुखांना अवैध धंदे करण्यास सुट दिली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडं बीड जिल्ह्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून माफियाराज सुरू असल्यामुळे जे जिल्ह्यात अवैध धंदे सुरू आहेत. यात मोठ्या प्रमाणात सत्ताधारी नेत्यांचा सहभाग आहे, हे वारंवार सिद्ध होत असल्याने खळबळ उडालीय.

बीड: अवैध गुटखाविक्री प्रकरणात शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखावर गुन्हा दाखल
गुजरातमध्ये १२० कोटींचे ड्रग्ज जप्त: एटीएसची कारवाई

याविषयी पोलीस अधीक्षकांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला असून या प्रकरणात आरोप असलेले शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलीक खांडे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. गुटखा प्रकरणात कारवाई झाली असता कार्यकर्त्याचा फोन आला म्हणून मी घटनास्थळावर ते गेलो होतो. त्यामुळे मला या प्रकरणात गोवलं गेलं असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केला आहे.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com