चिंचपूर जमीन घोटाळा प्रकरण; मंडळाधिकारी निलंबित तर नायब तहसीलदाराचा अहवाल मुख्य सचिवांकडे

48 तासांपेक्षा जास्त पोलीस कोठडीत राहिल्याने, जिल्हाधिकारी राधा विनोद शर्मा यांनी केली कारवाई
Beed land scam case
Beed land scam case विनोद जिरे

बीड: बीडमध्ये पुन्हा एकदा साम टीव्हीच्या बातमी दणका पाहायला मिळाला आहे. देवस्थान आणि वक्फ बोर्ड जमीन घोटाळा प्रकरणाची मालिका साम टीव्हीने दाखवल्यानंतर, आता जिल्ह्यात एक- एक कारवाया होत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर बीडच्या आष्टी तालुक्यातील चिंचपूर वक्फ बोर्ड इनामी जमीन घोटाळा प्रकरणात (land scam case), गुन्हा दाखल झाल्यानंतर नायब तहसिलदार प्रदीप पांडुळे, मंडळ अधिकारी सिंगनवाड हे 48 तासापेक्षा जास्त वेळ पोलीस कोठडीत होते.

हे देखील पहा-

यामुळं जिल्हाधिकारी (Collector) राधाबिनोद शर्मा यांनी मंडळ अधिकारी सिंगनवाड यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. नायब तहसिलदार पांडुळे यांचा अहवाल अप्पर मुख्य सचिवांकडे पाठविला आहे. आष्टी (Ashti) तालुक्यातील इनामी जमीन घोटाळा प्रकरणात, चिंचपूरच्या गुन्ह्यात नायब तहसिलदार प्रदीप पांडुळे आणि मंडळ अधिकारी एस. जी. सिंगनवाड यांना पोलिसांनी अटक (Arrested) केली होती. यावेळी 18 फेब्रुवारी पासून ते 20 फेब्रुवारी दुपारपर्यंत ते पोलीस (Police) कोठडीत होते.

Beed land scam case
'मन की बात'मध्ये पंतप्रधान मोदींचे भाषण, म्हणाले- निर्यातीत देशाचे विक्रम

या दोघांच्या अटकेचा कालावधी हा 57 तास 28 मिनीटे असल्याचा अहवाल आष्टी पोलीस निरीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता. त्या अनुषंगाने मंडळ अधिकारी सिंगनवाड यांना शासन सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांची विभागीय चौकशीही प्रस्तावित करण्यात आली आहे. तर पांडुळे हे उस्मानाबादच्या परांडा येथे कार्यरत असून त्यांना झालेल्या अटकेचा अहवाल देखील मुख्य सचिवांकडे पाठवण्यात आला आहे. दरम्यान या कारवाईने घोटाळेबाज अधिकारी कर्मचाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com