बीडमध्ये विकेंड लॉकडाऊनला हरताळ !

मनमोहक धबधब्याचा आनंद घेतांना नागरिकांकडून लहान मुलांचा जीव घातला जातोय धोक्यात. नागरिकांकडून चोरट्या मार्गाने विनामास्क निसर्ग पर्यटन.
बीडमध्ये विकेंड लॉकडाऊनला हरताळ !
बीडमध्ये विकेंड लॉकडाऊनला हरताळ !विनोद जिरे

बीड : बीडमध्ये विकेंड लॉकडाऊनला हरताळ फासत, नागरिकांडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असणाऱ्या ठिकाणी चोरट्या मार्गाने प्रवेश करून, विनामास्क निसर्ग पर्यटन केलं जातं आहे. बीडच्या कपिलधार येथे मंथनस्वामी देवस्थानाच्या समोर असणाऱ्या, मनमोहक धबधब्याचा आनंद घेताना नागरिकांकडून लहान मुलांचा जीव घोक्यात घातला जात आहे.

हे देखील पहा -

बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत नसल्याने, प्रशासनाने जिल्ह्यात लागू असणाऱ्या कोरोना नियमात सूट दिली नाही. त्यामुळं अद्यापही आठवड्यातील 5 दिवस 7 ते 4 विविध आस्थापना सुरू करण्यास परवानगी आहे. तर शनिवार आणि रविवार यादिवशी विकेंड लॉकडाऊन लागू आहे. विशेष म्हणजे बीडच्या आष्टी, पाटोदा,शिरूर कासार, गेवराई तालुक्यात दुपारी 12:30 पर्यतचं मार्केट उघडण्यास परवानगी आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सीमेवर आता अँटीजन टेस्ट देखील सुरू करण्यात आल्या आहेत.

बीडमध्ये विकेंड लॉकडाऊनला हरताळ !
अँटीजन टेस्टविना बीड जिल्ह्यात प्रवेश नाही..

मात्र या कोरोनाच्या आणि जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या नियमांना, बीडकरांकडून हरताळ फासला जात आहे. त्याचबरोबर मनमोहक धबधब्याचा आनंद घेण्यासाठी, चक्क नागरिकांकडून विनामास्कपणे लहान मुलांचा जीव देखील धोक्यात घातला जात आहे. यामुळं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.