Beed Crime: धक्कादायक! व्यसनमुक्ती केंद्रात महिला डॉक्टरला डांबून ठेवलं, केली शरीरसुखाची मागणी

Beed Crime: बीड जिल्हा आरोग्य यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत बेकायदेशीर व्यसनमुक्ती केंद्रावर धाड टाकली.
Beed Crime
Beed Crimesaam tv

>> विनोद जिरे, बीड

Beed News : बीड जिल्ह्यात नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राच्या नावाखाली बेकायदेशीर धदा सुरु असल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच याठिकाणी आलेल्या रुग्णांची छळवणूक आणि महिलांचे लैंगिक शोषण केले जात असल्याचे देखील समोर आले आहे.

बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुरेश साबळे यांनी पोलिसांच्या मदतीने बेकायदा औषध उपचार करणाऱ्या नवजीवन व्यसनमुक्ती केंद्राचा भांडाफोड केला. नवजीवनच्या केज, मोरेवाडी, वाघाळा आणि बीड येथील केंद्र सील करून पोलीस आणि आरोग्य प्रशासनाने येथील रुग्णांची सुटका केली आहे.

Beed Crime
ED Raid: मोठी बातमी! हसन मुश्रीफांच्या अडचणीत वाढ? ९ तास चौकशीनंतर ईडीने बजावले समन्स; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणावर एक्सपायरी झालेली औषधे, बेकायदेशीर स्टाफ, खोटी कागदपत्रे आढळून आली आहे. हे चारही केंद्र सील करण्यात आले अशून या प्रकरणी वेगवेगळे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Latest Marathi News)

दरम्यान अंबाजोगाई तालुक्यातील वाघाळा येथील नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रातील एका महिला डॉक्टरकडे शरीरसुखाची मागणी करून त्यांना डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात अंजली पाटील, संचालक डॉ राजकुमार गवळे आणि ओम डोलारे यांच्याविरुद्ध अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

Beed Crime
Mumbai News : सहायक पोलीस आयुक्तांचा ऑफिसमध्येच मृत्यू, जेवणानंतर विश्रांती घेत असताना दुर्दैवी घटना

यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या आदेशानुसार अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, कविता कर, पंकज कुमावत यांच्या पथकाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉस सुरेश साबळे यांना सोबत घेत वाघाला, मोरेवाडी, केज आणि बीड शहरातील जिजामाता चौक भागात असलेल्या नवजीवन व्यसनमुक्ती केंद्रावर छापे घातले. (Beed News)

येथील केंद्रातून 28 रुग्णांची सुटका करून त्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले, तर केज, मोरेवाडी आणि वाघाला येथील तब्बल शंभर पेक्षा अधिक रुग्णांना त्या त्या ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या सर्व ठिकाणी व्यसनमुक्ती केंद्राच्या नावाखाली बेकायदेशीर कारभार सुरू असल्याचे या कारवाईत आठळून आले आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com