परळीत चोरट्यांचा धुमाकूळ; घरातील कपाटातून तब्बल 10 लाखांची रोकड लंपास

परिसरात चोरांच्या दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
Parali Police Station
Parali Police Stationविनोद जिरे

बीड - जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज कुठे ना कुठे चोऱ्यांच्या घटना सतत घडत आहेत. परळी (Parali) शहरात, एका घरातील कपाटात ठेवलेली तब्बल 10 लाखांची रोकड, अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे. ही घटना शहरातील विद्यानगर भागात उघडकीस आल्याने, परिसरात चोरांच्या दहशतीचे वातावरण निर्माण झालं आहे.

हे देखील पाहा -

पोलीस (Police) सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून, शिक्षण विभागात गटशिक्षण अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले, लक्ष्मण किसनराव फुलगुंडे हे शहरातील विद्यानगर भागात राहतात. फुलगुंडे यांनी त्यांच्या घराच्या पाठीमागे असलेल्या, पत्र्याच्या स्टोअर रूममधील कपाटात रोकड ठेवली होती. याच कापटात ठेवलेल्या 2 हजार रुपयांच्या 50 नोटा आणि 500 रुपयांच्या 1,794 नोटा, अशी एकूण 9 लाख 97 हजार रुपयांची नगदी रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे.

Parali Police Station
कन्हान नदीत पुन्हा वीज केंद्राची राख; नागपूरकरांना प्यावं लागतंय राखयुक्त पाणी

या प्रकरणी लक्ष्मण फुलगुंडे यांच्या फिर्यादीवरून, परळी शहर पोलीस ठाण्यात कलम 457,380 भा.द.वी नुसार अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेने परळी शहरातील नागरिकात, चोरट्यांविषयीची एक प्रकारची दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे तात्काळ या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशीच मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com