Beed Crime News: 'पक्षाचं काम थांबव, नाहीतर गोळ्या झाडून दाभोलकर करु; BRS नेत्याला निनावी पत्राद्वारे धमकी, बीडमध्ये खळबळ

Beed Crime News: बीडच्या गेवराई येथील माजी जिल्हा परिषद सभापतीचे पती तथा बीआरएसचे नेते बाळासाहेब मस्के आणि त्यांच्या पत्नी मयुरी मस्के यांना देण्यात आली आहे.
Shirpur Crime News
Shirpur Crime NewsSaam tv

Beed Crime News:

बीआरएस पक्षाच्या नेत्यासह त्यांच्या पत्नीला गोळ्या झाडून हत्या करण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. निनावी पत्राद्वारे, 'बीआरएस पक्षाचे काम थांबव, अन्यथा तुझा दाभोलकर करू', अशी धमकी बीडच्या गेवराई येथील माजी जिल्हा परिषद सभापतीचे पती तथा बीआरएसचे नेते बाळासाहेब मस्के आणि त्यांच्या पत्नी मयुरी मस्के यांना देण्यात आली आहे. (Latest Marathi News)

तुम्ही दोघे नवरा - बायको गेवराई तालुक्यात शिबीर घेऊन आमच्या नेत्यांचे खच्चीकरण करत आहात. त्यामुळे बीआरएसचे काम थांबव, अन्यथा गोळ्या घालून दाभोलकर करु, अशी धमकी बाळासाहेब मस्के व पत्नी मयुरी खेडकर - मस्के यांना निनावी पत्राद्वारे देण्यात आल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Shirpur Crime News
Singaporean Crime News: कोरोना पॉझिटिव्ह असूनही मास्क काढून सहकाऱ्यांवर खोकला; आता भोगतोय गंभीर परिणाम, वाचा नेमकं काय घडलं?

या पत्रात अत्यंत खालची भाषा वापरून खोट्या केसेसमध्ये अडकवून तुरुंगात टाकण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. याप्रकरणी बाळासाहेब मस्के यांनी माझ्यासह माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या जिवीतास धोका असल्याची तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीआरएस पक्षाच्या गेवराई विधानसभा समन्वयक मयुरी मस्के व बी.एम. प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बाळासाहेब मस्के हे सध्या गेवराई तालुक्यात गाव तेथे आरोग्य शिबीर घेत आहेत. या शिबिराला गावोगाव मोठा प्रतिसाद मिळत असून हजारो लोक शिबिराचा लाभ घेत असल्याचे दिसत आहे.

Shirpur Crime News
Bhiwandi Crime News: दुर्गंधीमुळे शेजारी वैतागले, दार उघडताच पायाखालची जमीनच सरकली!

निनावी पत्रात काय म्हटलं?

त्यामुळं या निनावी पत्रात बाळासाहेब मस्के यांना खालच्या पातळीवरील भाषा वापरत 'तू बीआरएस पक्षात जाऊन जास्त माजलास का, तुला जास्त झालय का, तू गावोगाव शिबीर घेऊन आमच्या नेत्यांचं खच्चीकरण करत आहे. त्यामुळे तू करत असलेलं राजकारण बंद कर, अन्यथा आमच्या नेत्याचा आदेश आल्यावर तुला गोळ्या घालून तुझा दाभोलकर करु', अशी धमकी देऊन अत्यंत खालची भाषा वापरली आहे.

दरम्यान, याप्रकरणी बाळासाहेब मस्के यांनी तक्रार दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com